घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नामवंत न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण सोलापूर शहरात शोककळा पसरली आहे.
डॉ. वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले होते. त्यांचं रुग्णालय हे अनेकांसाठी आशेचं ठिकाण ठरत होतं. मात्र, हेच रुग्णालय त्यांच्या शेवटच्या श्वासाचं साक्षीदार ठरलं, ही बाब अधिकच वेदनादायक ठरते. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे.
घटनेनंतर रुग्णालयातील महिला आणि पुरुष कर्मचारी यांचे अश्रू थांबत नव्हते. अनेकांना ही बातमी विश्वास बसणारी नव्हती. वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, रुग्ण, नातेवाईक आणि चाहत्यांमध्ये शोकाची लाट उसळली आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर हे केवळ एक कुशल डॉक्टर नव्हते, तर रुग्णांशी आत्मीयतेने वागणारे, संवेदनशील आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अचानक जाण्याने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला मोठी हानी झाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून, आवश्यक तपास प्रक्रिया सुरु केली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येचं कारण काय असावं? मानसिक ताण, वैयक्तिक समस्या की इतर कोणतेही कारण? याचा उलगडा होणं गरजेचं आहे, जेणेकरून वैद्यकीय क्षेत्रातील इतरांना मदत होईल.
सध्या संपूर्ण सोलापूर शोकमग्न असून, सर्व स्तरांतून डॉ. वळसंगकर यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
Comments
Post a Comment