घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
एका भीषण झालेल्या अपघातात मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील दैठणा- माळसोन्ना रोडवर गुरुवारी (दि. १७) संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पोरवड येथील प्रल्हाद उद्धवराव गिराम (वय २७) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. यात त्यांची बहीण कल्पना पांडुरंग धोंडगे व दोन भाचे गंभीर जखमी झाले होते. त्यातील माऊली पांडुरंग धोंडगे (वय ६) या चिमुकल्याचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
प्रल्हाद गिराम हे आपल्या बहिणीसह भाच्यांना एस.टी. बसमध्ये बसवण्यासाठी दुचाकीवरून पोखर्णीकडे जात होते. त्यावेळी माळसोन्नाकडे भरधाव वेगात जाणाऱ्या टिप्पर (क्र. एमएच ४० सीडी ४५९८) ने विरुद्ध दिशेने येऊन त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रल्हाद गिराम हे जागीच ठार झाले तर त्यांची बहीण कल्पना व भाचे ध्रुवा व माऊली हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती समजताच पोरवड येथील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना तत्काळ परभणी येथे खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र माऊली धोंडगे या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी टिप्परवर दगडफेक केली व त्यास जाळण्याचा प्रयत्न केला. या वेळी दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये यांनी ट्रकवर उभे राहून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी वेळीच हजर राहून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी गणपती गिराम यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक आकाश गायकवाड याच्याविरोधात दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment