Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

शेतकऱ्यांना पीकवीमा, फळपीक विमा व नमो शेतकरी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा

Image
३२३१.६० कोटींच्या निधीचे वितरण सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत ३२३१.६० कोटींच्या निधीचे वितरण ! शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    राज्य शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप २०२३, रब्बी २०२३-२४, तसेच रब्बी २०२४-२५ साठी एकूण रु. ३२३१.६० कोटी इतका निधी विमा कंपन्यांना वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार यामध्ये नुकसान भरपाई, शेतकरी विमा हप्ता अनुदान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा समावेश आहे. काल २७ मार्च रोजी शासनाने तसे आठ परिपत्रक जारी केले.       हे निर्णय राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणारे ठरणार आहेत. खालीलप्रमाणे या निधीचे वितरण करण्यात येणार आहे: १. खरीप २०२३ व रब्बी २०२३-२४ साठी परतावा आणि समायोजन    राज्य शासनाने खरीप २०२३ मधील नाकारलेल्या अर्जांकरिता जमा झालेली शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम समायोजित करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय, विमा कंपन्यांकडून राज्य शासनास अपेक्षित परतावा प्राप्त होणार आहे. २. खरीप २०२४ साठी शेतकरी हप्ता अनुदान     खरीप हंगाम...

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०,००० रुपये प्रतिहेक्टरी प्रोत्साहन अनुदान जीआर निघाला

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        खरीप पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी विधानमंडळाच्या २०२४ हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रतिहेक्टरी २०,००० प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. तसेच यावर्षी नुकत्याच चालू असलेल्या अधिवेशनातही यावर चर्चा झाली होती.     या घोषणेला प्रत्यक्षात आणत महाराष्ट्र शासनाने नुकताच अधिकृत शासननिर्णय जाहीर केला आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम कधी जमा होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.    शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून, या प्रोत्साहनपर अनुदानामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य लाभणार आहे.      धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या योजनेमुळे शेतकऱ...

कोठाळा येथे जबरी चोरी: वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करत मुद्देमाल लंपास

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        गोंदी जवळील कौठाळा खुर्द गावात गुरुवारी रात्री २७ मार्च रोजी मध्य रात्रीच्या सुमारास एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरात जबरी चोरीचा प्रकार घडला. श्रीरंग शहादेव गुळवणे (वय ६२) आणि त्यांच्या पत्नी झोपेत असताना रात्री सुमारे दीड वाजता अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.      चोरटा घरातील कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरत असताना श्रीरंग गुळवणे यांनी त्याला पाहिले. त्यांनी चोरट्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्याने त्यांच्या डोक्यात हातोडीने आणि छातीत चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गुळवणे गंभीर जखमी झाले. तसेच, चोरट्याने त्यांच्या डाव्या हातालाही हातोडीने मारून जबर दुखापत केली.    चोरट्याने कपाटातील बारा हजार रुपयांची नगदी रक्कम, साठ हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम सोन्याचे कानातील झुंबर, ५ ग्रॅमची अंगठी, आणि सोळा हजार रुपये किंमतीच्या २० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पायातील चैन असे एकूण ८८ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.     या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्यात गुन्...

कालव्यात पडून दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; १२ किमी अंतरावर सापडला मृतदेह

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जायकवाडी च्या कालव्यात पडल्याने दहा वर्षीय मुलगा वाहून गेल्याची अतिशय दुर्दैवी घटना २६ मार्च बुधवार रोजी घडली. शोध घेतल्यानंतर बारा किमीवर अंतरावर त्याचा मृतदेह सापडला.     बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे २६ मार्च, बुधवार रोजी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. दहा वर्षीय अमर शिवाजी लोखंडे या मुलाचा कालव्यात पडून वाहून गेल्याने मृत्यू झाला. कुटुंबीय आणि पोलीस प्रशासनाने त्याचा शोध सुरू केला, मात्र काल मृतदेह सापडला नाही. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केल्यानंतर दुपारी जातेगाव शिवारात, तब्बल १२ किलोमीटर अंतरावर, मुलाचा मृतदेह आढळून आला.    अमर लोखंडे, गणेशनगर भागातील रहिवासी, हा काल दुपारी काही मित्रांसह कालव्यावर पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात पडल्याने तो वाहून गेला आणि त्यानंतर पाण्याच्या प्रवाहात बुडाला. सोबत गेलेल्या मुलांनी तातडीने घरी जाऊन कुटुंबीयांना ही माहिती दिली. कुटुंबीयांनी लगेच कालव्याकडे धाव घेतली, मात्र त्याचा पत्ता लागला नाही.    शोधकार्य सुरू असताना तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक ...

उष्णतेची लाट महाराष्ट्र शासनाच्या सर्व जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांसाठी उष्णतेच्या लाटेच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनांचे निर्गम जारी केले आहेत. या सूचनांचा उद्देश जिल्हास्तरावर उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर समस्यांना कमी करणे आहे.     उपरोक्त सूचनांमध्ये सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), नवी दिल्लीच्या पत्राच्या आधारे १९ मार्च २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, जिल्हा स्तरावर संबंधित प्रशासकीय विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा, असे सांगण्यात आले आहे. महानगरपालिका आणि सार्वजनिक विभागांनी घ्यायची उपाययोजना      सावली व पाण्याची सोय: बाजारपेठा, बस स्टैंड, टॅक्सी स्टैंड, रिक्षा स्टैंड, व शासकीय कार्यालयांमध्ये सावलीची व्यवस्था कर...

१ मेपासून एटीएममधून पैसे काढणे महागणार: नवीन शुल्कवाढ लागू

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      नवी दिल्ली: १ मेपासून देशभरातील एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे, कारण रिझर्व्ह बँकेने एटीएम इंटरचेंज शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. पूर्वी एका व्यवहारासाठी १७ रुपये शुल्क आकारले जात होते, परंतु आता प्रतिव्यवहार १९ रुपये लागणार आहेत. या वाढीचा परिणाम विशेषतः ज्या ग्राहकांचा एटीएम व्यवहारांचा जास्त वापर होतो त्यांच्यावर अधिक जाणवणार आहे. याशिवाय, खात्यातील शिल्लक तपासण्यासाठीही आता ७ रुपये प्रतिव्यवहार लागणार आहेत, जे आधी ६ रुपये होते.      रिझर्व बँकेने ही शुल्कवाढ व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटर्सच्या विनंतीनंतर केली आहे. ऑपरेटर्सनी वाढत्या कामकाज खर्चामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगितले होते. यामुळे बँकांना इंटरचेंज फी वाढवण्यास परवानगी देण्यात आली. हे शुल्क बँक ग्राहकांना त्यांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी द्यावे लागणार आहे, ज्याचा भार लहान बँकांच्या ग्राहकांवर विशेषतः अधिक जाणवेल, कारण या बँका मोठ्या वित्तीय संस्थांवर अवलंबून असतात. शुल्कवाढीचा परिणाम     १ मेपासून, ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठ...

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या- सर्वोच्च न्यायालयाची पाऊलवाट: नॅशनल टास्क फोर्सची स्थापना

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांमधील आत्महत्या रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नॅशनल टास्क फोर्स (NTF) ची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या आणि शिक्षण संस्थांमधील अपुरे संरक्षण यावर प्रकाश टाकत, कोर्टाने शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात घेतले आहे.     माजी न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या नेतृत्वाखालील या टास्क फोर्सला विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असेल. या टास्क फोर्समध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाव्यतिरिक्त राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे प्रतिनिधी, तसेच कायदेशीर बाबींचे सदस्य पदसिद्ध असतील.    टास्क फोर्स विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमुख कारण शोधण्यासाठी आणि विद्यमान कायदे व धोरणांचे पुनरावलोकन करून त्या सुधारण्यासाठी शिफारसी देणार आहे. त्याचबरोबर, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही वेळी अचानक तपासणी करण्याचा अधिकार टास्क फोर्सला असेल.     सर्वोच्च न्यायालया...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या