घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

उष्णतेची लाट महाराष्ट्र शासनाच्या सर्व जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश

 



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


    महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांसाठी उष्णतेच्या लाटेच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनांचे निर्गम जारी केले आहेत. या सूचनांचा उद्देश जिल्हास्तरावर उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर समस्यांना कमी करणे आहे.


    उपरोक्त सूचनांमध्ये सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), नवी दिल्लीच्या पत्राच्या आधारे १९ मार्च २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, जिल्हा स्तरावर संबंधित प्रशासकीय विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा, असे सांगण्यात आले आहे.



महानगरपालिका आणि सार्वजनिक विभागांनी घ्यायची उपाययोजना

     सावली व पाण्याची सोय: बाजारपेठा, बस स्टैंड, टॅक्सी स्टैंड, रिक्षा स्टैंड, व शासकीय कार्यालयांमध्ये सावलीची व्यवस्था करावी व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. पंखा किंवा कुलर असतील तर ते योग्य स्थितीत ठेवावेत.

प्रथमोपचार व माहितीपत्रक

  सार्वजनिक ठिकाणी उष्माघातापासून बचावासाठी प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात व त्याच्या वापरासंबंधी सूचनाही लावाव्यात. उष्णतेच्या लाटांशी संबंधित जागरूकता वाढवण्यासाठी पोस्टर व बॅनर लावावेत.

थंड पाण्याची उपलब्धता

 टॅक्सी स्टैंड, बस स्टैंड, बाजार क्षेत्र, आणि शासकीय कार्यालयांमध्ये थंड पाण्याची सोय करावी. शॉपिंग मॉल्समध्ये ग्राहकांसाठी आणि बाहेरील लोकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महानगरपालिका आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

पाणी शिंपडणे व उद्याने खुली ठेवणे

 उपलब्ध असल्यास रस्त्यांवर पाणी शिंपडण्याचे नियोजन करावे. सर्व उद्याने दुपारी १२:०० ते ४:०० या वेळेत खुली ठेवावी.

आरोग्य विभागासाठी सूचना

    नोडल अधिकारी नेमणे: उष्णतेच्या लाटेसंदर्भातील आजारांचे निरीक्षण व अहवाल तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नियुक्त करावेत.

सार्वजनिक माहिती फलक

   प्रत्येक आरोग्य केंद्राच्या परिसरात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती असलेले फलक लावावेत.

वैद्यकीय सुविधा

   उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र वैद्यकीय वॉर्डाची व्यवस्था करावी.

नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्देश

    उष्णतेच्या लाटेच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. सार्वजनिक ठिकाणी शक्यतो सावलीत राहावे, पुरेसे पाणी पिऊन शरीरातील द्रवपदार्थांची पातळी नियंत्रित ठेवावी, आणि गरज असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.

   महाराष्ट्र शासनाच्या या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश राज्यातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या