अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०,००० रुपये प्रतिहेक्टरी प्रोत्साहन अनुदान जीआर निघाला



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     खरीप पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी विधानमंडळाच्या २०२४ हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रतिहेक्टरी २०,००० प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. तसेच यावर्षी नुकत्याच चालू असलेल्या अधिवेशनातही यावर चर्चा झाली होती.

    या घोषणेला प्रत्यक्षात आणत महाराष्ट्र शासनाने नुकताच अधिकृत शासननिर्णय जाहीर केला आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम कधी जमा होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

   शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून, या प्रोत्साहनपर अनुदानामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. 

    धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र शासनाने परिपत्रक काढेल निधी कधी उपलब्ध होणार व शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार याबाबत प्रश्नचिन्ह उमटत आहे.

   या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक हातभार लागेल व राज्यातील कृषी क्षेत्राला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या