घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
गोंदी जवळील कौठाळा खुर्द गावात गुरुवारी रात्री २७ मार्च रोजी मध्य रात्रीच्या सुमारास एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरात जबरी चोरीचा प्रकार घडला. श्रीरंग शहादेव गुळवणे (वय ६२) आणि त्यांच्या पत्नी झोपेत असताना रात्री सुमारे दीड वाजता अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
चोरटा घरातील कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरत असताना श्रीरंग गुळवणे यांनी त्याला पाहिले. त्यांनी चोरट्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्याने त्यांच्या डोक्यात हातोडीने आणि छातीत चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गुळवणे गंभीर जखमी झाले. तसेच, चोरट्याने त्यांच्या डाव्या हातालाही हातोडीने मारून जबर दुखापत केली.
चोरट्याने कपाटातील बारा हजार रुपयांची नगदी रक्कम, साठ हजार रुपये किंमतीचे १० ग्रॅम सोन्याचे कानातील झुंबर, ५ ग्रॅमची अंगठी, आणि सोळा हजार रुपये किंमतीच्या २० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पायातील चैन असे एकूण ८८ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.
या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments
Post a Comment