Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालन्यात मॉलमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ

Image
  जालन्यात मॉलमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ बॉम्ब शोधक व नाशक पथकाने यशस्वी मॉक ड्रील     जालना शहरातील मंठा चौफूली जवळील कृष्णा मॉल येथे आज १७ जानेवारी रोजी संशयास्पद वस्तु आढळल्याने खळबळ उडाली. नियंत्रण कक्षामार्फत प्राप्त झालेल्या माहितीवरून बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक केदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ RSP (Rendering Safe Procedure) पद्धतीनुसार कार्यवाही करण्यात आली.  बीडीडीएस पथकाचे तंत्रज्ञ पोकाँ आर. ए. देशमाने आणि पोह/एस. एच. निलवंत यांच्या कौशल्यपूर्ण कार्यवाहीने, संशयास्पद वस्तुची श्वान व उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. एक्स-रेच्या माध्यमातून बॉम्ब सदृश्य वस्तु आढळल्यानंतर, TM-04 उपकरणाच्या सहाय्याने सुरक्षित अंतरावर (SDA) नेऊन सदरील वस्तु निकामी करण्यात आली.   ही मॉक ड्रील जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यवाहीमध्ये एटीबी शाखेचे अधिकारी आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे अंमलदार...

खोटा गुन्हा दाखल करून अन्याय मागितला पोलीस अधिक्षकांकडे न्याय

Image
  खोटा गुन्हा दाखल करून अन्याय मागितला पोलीस अधिक्षकांकडे न्याय पोलीस अधिकाऱ्यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याच्या आरोप      जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा खुर्द येथील रहिवासी महादेव त्रिंबक थुटे यांनी आपल्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात सादर केलेल्या अर्जात त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर खोटा खुनाचा गुन्हा दाखल करून अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे.   महादेव थुटे यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की, त्यांच्या दुसऱ्या पत्नी आशामती आणि मुलगा शिवप्रसाद यांच्यात वाद होतो, ज्यामुळे आशामतीच्या वाईट वागणुकीमुळे शिवप्रसादने आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांनी तिर्थपुरी पोलीस स्टेशनला माहिती दिली होती, मात्र त्यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. महादेव थुटे यांनी योग्य तपास करण्याची विनंती केली असता, पोलीस अधिकारी साजेद अहेमद यांनी उलट त्यांच्यावर खुनाचा आरोप करत 302 कलमान्वये खोटा गुन्हा दाखल केला.    थुटे यां...

समृद्धी साखर कारखान्याकडून उस नेण्यास पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप

Image
  समृद्धी साखर कारखान्याकडून उस नेण्यास पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप    घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र कारखाना प्रशासनाकडून ऊस तोडणी विषयी पक्षपाती करण्यात येत असल्याची दिसून येत आहे. तशी तक्रार जालन्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.    ऊस तोड करताना प्रोग्राम नुसार व यादी जाहीर न करता. ऊस तोडण्यात येतो या बाबत कारखाना प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता. ऊस तोडण्या संबंधी तुम्ही कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांना फोन लावा. त्यानंतरच तुमचा ऊस तोडल्या जाईल. असे सांगितले जाते यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांचा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाल्यामुळे याचा राग मतदान न केल्याच्या संशयावरून शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यास चेअरमन सतीश घाटगे पिळवणूक करत आहे. तसेच वजन काट्यात हेरा-फेरी करून काटा मारण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांना दाट सशय आहे.   दरम्यान कारखाना प्रशासनाने शेअर्सच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून डिपॉझिटची मागणी केली शेतकऱ्यांनी आपला ऊस हक्काने कारखान्याकडे जाईल ...

जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू एक गंभीर

Image
  जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू एक गंभीर    बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या हिंसक घटनेत दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला, तर एक भाऊ गंभीर जखमी झाला आहे. अजय विलास भोसले आणि भरत विलास भोसले अशी मृतांची नावे असून, त्यांचा तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.   ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली. तीन सख्खे भाऊ वाहिरा येथे आले होते, तेव्हा त्यांच्यावर लोंखडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अजय आणि भरत यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.   अंभोरा पोलिसांनी सात संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत, आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.    घटनास्थळी अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने तातडीने ...

जालना - महावितरणचा कार्यकारी अभियंता लाचेच्या जाळ्यात

Image
  जालना - महावितरणचा कार्यकारी अभियंता लाचेच्या जाळ्यात  अभियंत्याला ४० हजारांची लाच घेताना पकडले    जालना जिल्ह्यातील आज महावितरणचा अ.कार्यकारी अभियंता लाचेच्या जाळ्यात सापडलाय या अभियंत्याला ४०  हजारांची लाच घेताना पकडन्यात आले.    महावितरणचे अ.कार्यकारी अभियंता प्रकाश तौर यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४०  हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई अंबड येथे करण्यात आली आहे.सदर घटना गुत्तेदाराकडून बिले काढण्यासाठी मागितलेल्या ५० हजार रुपयांच्या लाचेसंदर्भात घडली. गुत्तेदाराने तक्रार केल्यानंतर लाचलुचपत विभागाने या प्रकरणाचा सापळा रचला. त्यानुसार, ४० हजार रुपये स्वीकारताच तौर यांना जेरबंद करण्यात आले.   दि. १५ जानेवारी रोजी जालना येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अंबड उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश रामकृष्णराव तौर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तक्रारदार गुत्तेदाराने दिलेल्या माहितीनुसार, ट्रांसफार्मर बसविल्यानंतरच्या मागील चार महिन्यांच्या बिलासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आल...

विजय केवळ माझा नाही, तर सर्वसामान्य जनतेचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा आहे - आ हीकमत उढाण

Image
  विजय केवळ माझा नाही, तर सर्वसामान्य जनतेचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा आहे - आ हीकमत उढाण  "सत्कार नको, आता काम करायचे" वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण    २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक संकटांना सामोरे जावे लागले, परंतु महायुतीतील कार्यकर्ते, शिव सैनिक, तसेच मतदारांनी भरभरून साथ दिली. त्यामुळे हा विजय केवळ माझा नाही, तर सर्वसामान्य जनतेचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा आहे.असे प्रतीपादान घनसावंगी चे आमदार डॉ हीकमत उढाण यांनी तीर्थपुरी येथे केले   घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे आज, १२ जानेवारी रोजी आ. हीकमत उढाण आणि आ. राजेश विटेकर यांचा सत्कार आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवाजी शीवतारे, रवींद्र तौर, महेंद्र पवार, संतोष जेधे, चांदाताई शिंदे, नारायण बोबडे, चंद्रकांत कारके, शाम उढाण, विजसिंह खरात, जयमंगल जाधव, शलेंद्र पवार, उद्धव मरकड, रमेश बोबडे, सचिन चिमणे, प्रवीण कडूकर, श्रीकृष्ण बोबडे, दौलत मडके, सुधाकर बोबडे,  लक्ष्मण नवले यांसारख्या अनेक प्रमुख व्यक्तींनी हजेरी लावली होती.   घनसावंगी मतदारसंघातील निवडणुकीनंतर सत्...

जालना: आठ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा अखेर शोध

Image
  जालना: आठ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा अखेर शोध    जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी, जी १९ एप्रिल २०२४ रोजी शेतात शेळीसाठी चारा आणण्यासाठी गेली होती, अखेर सापडली आहे. तब्बल ८ महिन्यांपासून ती बेपत्ता होती. तिच्या आजोबांनी परतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटकडे वर्ग करण्यात आला होता.   तपासात, गावातील भागवत शिवाजी कोकाटे नावाचा तरुणही बेपत्ता असल्याचे समजले. कोकाटेचा मोबाईल बंद असल्यामुळे त्याचा ठावठिकाणा शोधणे कठीण झाले होते. मात्र, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने अथक प्रयत्न करून दोघांना संभाजीनगरच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरात शोधून काढले. भागवत कोकाटेने मुलीला पळवून नेऊन तिच्याबरोबर संसार थाटला होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून परतूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.   ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या प...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या