घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालन्यात मॉलमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ

 जालन्यात मॉलमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ

बॉम्ब शोधक व नाशक पथकाने यशस्वी मॉक ड्रील


   जालना शहरातील मंठा चौफूली जवळील कृष्णा मॉल येथे आज १७ जानेवारी रोजी संशयास्पद वस्तु आढळल्याने खळबळ उडाली. नियंत्रण कक्षामार्फत प्राप्त झालेल्या माहितीवरून बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक केदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ RSP (Rendering Safe Procedure) पद्धतीनुसार कार्यवाही करण्यात आली.


 बीडीडीएस पथकाचे तंत्रज्ञ पोकाँ आर. ए. देशमाने आणि पोह/एस. एच. निलवंत यांच्या कौशल्यपूर्ण कार्यवाहीने, संशयास्पद वस्तुची श्वान व उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. एक्स-रेच्या माध्यमातून बॉम्ब सदृश्य वस्तु आढळल्यानंतर, TM-04 उपकरणाच्या सहाय्याने सुरक्षित अंतरावर (SDA) नेऊन सदरील वस्तु निकामी करण्यात आली.

  ही मॉक ड्रील जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यवाहीमध्ये एटीबी शाखेचे अधिकारी आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे अंमलदार सहभागी होते. सदर मॉक ड्रीलमुळे संभाव्य धोका टळला असून, नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक केले आहे.


Comments

  1. mahiti gheun news det ja 🙏
    news bhetli ki pavt nka jau

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या