घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या हिंसक घटनेत दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला, तर एक भाऊ गंभीर जखमी झाला आहे. अजय विलास भोसले आणि भरत विलास भोसले अशी मृतांची नावे असून, त्यांचा तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली. तीन सख्खे भाऊ वाहिरा येथे आले होते, तेव्हा त्यांच्यावर लोंखडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अजय आणि भरत यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.
अंभोरा पोलिसांनी सात संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत, आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
घटनास्थळी अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने तातडीने भेट देत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
😺
ReplyDelete