घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक संकटांना सामोरे जावे लागले, परंतु महायुतीतील कार्यकर्ते, शिव सैनिक, तसेच मतदारांनी भरभरून साथ दिली. त्यामुळे हा विजय केवळ माझा नाही, तर सर्वसामान्य जनतेचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा आहे.असे प्रतीपादान घनसावंगी चे आमदार डॉ हीकमत उढाण यांनी तीर्थपुरी येथे केले
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे आज, १२ जानेवारी रोजी आ. हीकमत उढाण आणि आ. राजेश विटेकर यांचा सत्कार आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवाजी शीवतारे, रवींद्र तौर, महेंद्र पवार, संतोष जेधे, चांदाताई शिंदे, नारायण बोबडे, चंद्रकांत कारके, शाम उढाण, विजसिंह खरात, जयमंगल जाधव, शलेंद्र पवार, उद्धव मरकड, रमेश बोबडे, सचिन चिमणे, प्रवीण कडूकर, श्रीकृष्ण बोबडे, दौलत मडके, सुधाकर बोबडे, लक्ष्मण नवले यांसारख्या अनेक प्रमुख व्यक्तींनी हजेरी लावली होती.
घनसावंगी मतदारसंघातील निवडणुकीनंतर सत्काराच्या कार्यक्रमात आ. हीकमत उढाण यांनी स्पष्टपणे सांगितले की, "निवडणूक झाली, निकाल लागला, खूप सत्कार झाले. पण आता सत्कार नको, काम करायचे आहे." त्यांनी आपल्या संघर्षाचा आढावा घेतला आणि सांगितले की, "मागील दहा वर्षांतील कठोर परिश्रमामुळे आज मला यश मिळाले आहे. माझ्याबद्दल अनेक फेक निरेटिव्ह तयार करण्यात आले, परंतु जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला."
आ उढाण यांनी २०१४ साली झालेल्या पराभवाच्या आठवणी सांगत, "घनसावंगी मतदारसंघ मला २०१४ साली पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कळला. २०१९ मध्ये थेट लढाई झाली, जिथे एक हजार चुका झाल्या, पण नशीब बलवत्तर होते आणि मतदारांनी मोलाची साथ दिली." त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, प्रत्येक गावात जाऊन प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि शांत बसण्याऐवजी सक्रियपणे जनतेत राहून काम केले.
आ. उढाण म्हणाले की, २०२४ ची विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी सर्वात कठीण होती. "विरोधकांसह जवळपास सर्वांनीच मला घेरण्याचा प्रयत्न केला, पण सर्वसामान्य जनतेने मला साथ दिली. काहीही होवो, हीकमत दादांना एकदा आमदार करायचे, असा ठाम निर्णय जनतेने घेतला." त्यांनी हा विजय दैवी चमत्कार असल्याचेही सांगितले आणि अजूनही त्यांना आमदार झाल्याचे स्वप्नवत वाटते आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, निवडणुकीदरम्यान अनेक संकटांना सामोरे जावे लागले, परंतु महायुतीतील कार्यकर्ते, शिव सैनिक, तसेच मतदारांनी भरभरून साथ दिली. त्यामुळे हा विजय केवळ माझा नाही, तर सर्वसामान्य जनतेचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा आहे.
मतदारसंघातील मुख्य समस्या रस्ता, ऊस आणि सिंचनाच्या आहेत, असे सांगून आ. उढाण यांनी जास्तीत जास्त निधी आणून या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. "जनतेच्या विश्वासाला पात्र ठरू आणि चांगल्या प्रकारे काम करू," असे त्यांनी शेवटी सांगितले.
आ. राजेश विटेकर यांनीही आपले विचार मांडले. "मला सासरवडीत आल्यासारखे वाटते आहे," असे सांगून त्यांनी घनसावंगी मतदारसंघाच्या विकासासाठी निधी आणण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आपली जबाबदारी ओळखून जनतेसाठी काम करण्याची तयारी दर्शवली. "नुसती आश्वासने नकोत, काम हवे," असे स्पष्ट करत त्यांनी विकास कामांसाठी सरकारकडून अधिकाधिक निधी मिळविण्याचे आश्वासन दिले.
आ. विटेकर यांनीही आपल्या भाषणात आ. हीकमत उढाण यांच्या संघर्षाचे कौतुक केले आणि त्यांची इष्ट शक्ती पक्की असल्याचे सांगितले. "घनसावंगी मतदारसंघासाठी ७ कोटी निधी मंजूर झाला आहे," असे त्यांनी जाहीर केले. विकास कामांची गती वाढवण्यासाठी या कार्यक्रमाने एक नवा टप्पा सुरू झाला आहे, ज्यातून घनसावंगी तालुक्याच्या विकासाची आशा आहे.
"प्रत्येकाने मी उमेदवार मानून प्रचार केला." - महेंद्र पवार
तीर्थपुरी येथे आयोजित विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की, या विधानसभा निवडणुकीत "प्रत्येकाने मी उमेदवार मानून प्रचार केला. म्हणून आपल्याला यश प्राप्त झाले." ते पुढे म्हणाले की, "तीर्थपुरी हे केंद्रबिंदू आहे, जिथे २४ हजार लोकांची ये-जा होते. जिल्हा परिषद शाळा, विधिमंडळ प्रश्न, इमारतींच्या समस्यांवर आणि शिक्षक जागांवर लक्ष देणे गरजेचे आहे."
पवार यांनी रस्ता, एक्स्प्रेस कॅनाल यांसारख्या प्रश्नांवरही भाष्य केले. त्यांनी माजी मंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका करत २५ वर्षे आश्वासनांद्वारे जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. "संधीचे सोने करून जनतेसाठी काम करणे महत्त्वाचे आहे. कामे दर्जेदार आणि टिकाऊ होणे गरजेचे आहे," असे ते म्हणाले.
आज तीर्थपुरीत ५ कोटी १५ लाख रुपये खर्चून विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच रस्ते, पाणीप्रश्न, भूमिगत गटार योजना व इतर कामे करणे गरजेचे आहे ते दोन्ही आमदार यांच्या माध्यमातून पूर्ण करू असे आश्वासन दिले की, "रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
महेंद्र पवार यांनी सांगितले की, "दोन्ही आमदारांनी राज्य मंत्री व्हावे, ज्यामुळे विकासकामांची गती वाढेल." त्यांनी दोन्ही आमदारांकडून टिकाऊ विकास करण्याची अपेक्षा व्यक्त केली आणि तीर्थपुरीच्या विकासाचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमास तीर्थपुरी व परिसरातील असंख्य महायूतिचे नेते, कार्यकर्ते, मतदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment