अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना - महावितरणचा कार्यकारी अभियंता लाचेच्या जाळ्यात

 जालना - महावितरणचा कार्यकारी अभियंता लाचेच्या जाळ्यात 

अभियंत्याला ४० हजारांची लाच घेताना पकडले


   जालना जिल्ह्यातील आज महावितरणचा अ.कार्यकारी अभियंता लाचेच्या जाळ्यात सापडलाय या अभियंत्याला ४०  हजारांची लाच घेताना पकडन्यात आले.

   महावितरणचे अ.कार्यकारी अभियंता प्रकाश तौर यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४०  हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई अंबड येथे करण्यात आली आहे.सदर घटना गुत्तेदाराकडून बिले काढण्यासाठी मागितलेल्या ५० हजार रुपयांच्या लाचेसंदर्भात घडली. गुत्तेदाराने तक्रार केल्यानंतर लाचलुचपत विभागाने या प्रकरणाचा सापळा रचला. त्यानुसार, ४० हजार रुपये स्वीकारताच तौर यांना जेरबंद करण्यात आले.

  दि. १५ जानेवारी रोजी जालना येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अंबड उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश रामकृष्णराव तौर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तक्रारदार गुत्तेदाराने दिलेल्या माहितीनुसार, ट्रांसफार्मर बसविल्यानंतरच्या मागील चार महिन्यांच्या बिलासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर लाच रक्कम ४० हजार रुपये ठरविण्यात आली.

  पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसमक्ष ही कारवाई केली. प्रकाश तौर यांनी तक्रारदाराकडून ४० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडले गेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  या यशस्वी सापळा कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, आणि पोलीस उपअधीक्षक बाळु जाधवर यांचे मार्गदर्शन सापळा पथकातील पोलीस अंमलदार जावेद शेख, शिवलिंग खुळे, गणेश बुजाडे, भालचंद्र बिनोरकर  आदींनी ही कारवाई पार पाडली.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या