घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना: आठ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा अखेर शोध

 जालना: आठ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा अखेर शोध


   जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी, जी १९ एप्रिल २०२४ रोजी शेतात शेळीसाठी चारा आणण्यासाठी गेली होती, अखेर सापडली आहे. तब्बल ८ महिन्यांपासून ती बेपत्ता होती. तिच्या आजोबांनी परतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटकडे वर्ग करण्यात आला होता.

  तपासात, गावातील भागवत शिवाजी कोकाटे नावाचा तरुणही बेपत्ता असल्याचे समजले. कोकाटेचा मोबाईल बंद असल्यामुळे त्याचा ठावठिकाणा शोधणे कठीण झाले होते. मात्र, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने अथक प्रयत्न करून दोघांना संभाजीनगरच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरात शोधून काढले. भागवत कोकाटेने मुलीला पळवून नेऊन तिच्याबरोबर संसार थाटला होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून परतूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

  ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या प्रभारी महिला पोलीस निरीक्षक पूजा कदम व त्यांच्या टीमने केली आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या