घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा खुर्द येथील रहिवासी महादेव त्रिंबक थुटे यांनी आपल्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात सादर केलेल्या अर्जात त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर खोटा खुनाचा गुन्हा दाखल करून अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
महादेव थुटे यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की, त्यांच्या दुसऱ्या पत्नी आशामती आणि मुलगा शिवप्रसाद यांच्यात वाद होतो, ज्यामुळे आशामतीच्या वाईट वागणुकीमुळे शिवप्रसादने आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांनी तिर्थपुरी पोलीस स्टेशनला माहिती दिली होती, मात्र त्यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. महादेव थुटे यांनी योग्य तपास करण्याची विनंती केली असता, पोलीस अधिकारी साजेद अहेमद यांनी उलट त्यांच्यावर खुनाचा आरोप करत 302 कलमान्वये खोटा गुन्हा दाखल केला.
थुटे यांनी असा आरोप केला आहे की, पोलीस अधिकारी साजेद अहेमद आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण माळी यांनी मिळून त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. शिवाय, तिर्थपुरी प्रा. आ. केंद्राचे डॉक्टर यांचीही भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले आहे.
महादेव थुटे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नार्को टेस्ट घेण्यात यावी आणि खोटा गुन्हा रद्द करून संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
Comments
Post a Comment