Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

मराठा आरक्षणासाठी काहींची ठाम भूमिका–काहींची बोलती बंद!

Image
  मंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर मनोजदादा जरांगे पाटील उपोषण करत असताना, राज्य सरकारच्या हालचालींना गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.       या बैठकीत उपस्थित राहून काही मान्यवरांनी मराठा आरक्षणाचा तातडीने तोडगा निघावा आणि मनोजदादांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी ठाम भूमिका मांडली. तर काही मान्यवर बग्याच्या भूमिकेत दिसून आले असून काहींची बोलती बंद झाल्याचे चित्र दिसले.     बैठकीत आंदोलकांच्या मागण्या या समाजाच्या अस्तित्वाशी निगडित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून त्वरीत निर्णय घ्यावा, असा आग्रह सर्वपक्षीय नेत्यांनी धरला.     यात आमदार प्रकाश दादा सोळंके, आमदार सुरेश अण्णा धस, आमदार विजयसिंह पंडित, आ संदीप सिरसागर यांनी मराठी आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तसे...

मुंबईत आंदोलनादरम्यान लातुरातील मराठा आंदोलकाचा मृत्यू

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान लातुरातील एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. विजयकुमार घोगरे (रा. टाकलगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय अशी माहिती हाती येत आहे.    आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, तिथे राहण्यापासून ते जेवणापर्यंत प्रचंड हाल होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. अशाच प्रतिकूल परिस्थितीत आंदोलनात सहभागी झालेल्या लातुरातील कार्यकर्त्याचा जीव गेला आहे. या घटनेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.        विजयकुमार घोगरे हे मराठा आरक्षण लढ्यातील एक बिनीचे शिलेदार मानले जात होते. त्यांच्या निधनाने मराठा समाजाने आणखी एक हिम्मतीचा मोती गमावला आहे. स्थानिक ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना अतिशय वेदनादायी होत्या. निःशब्द... दुर्दैवी घटना... आणखी एक मोती गळून पडला,अशा शब्दांत कार्यकर्त...

वंशावळ समितीची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवली

Image
२९ ऑगस्ट रोजीचा शासन निर्णय वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या वंशावळ समितीला शासनाने मोठा दिलासा दिला आहे.     या समितीच्या कामकाजासाठी शासनाने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केला असून, याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.   पार्श्वभूमी     मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत योग्य वंशावळ नोंदी, पुरावे व तपासणी आवश्यक आहे. या प्रक्रियेतील गुंतागुंत लक्षात घेऊन शासनाने मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. त्यानंतर, तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र वंशावळ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.    या समित्या...

जालन्यात चारचाकी विहिरीत कोसळली

Image
राजूर-टेंभुर्णी रस्त्यावर भीषण अपघात : मृतांचा आकडा वाढण्याची भीती वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालन्यात आज सकाळी एक भीषण अपघात झालाय यात चक्की चारचाकी गाडी विहिरीत कोसळली. राजूर-टेंभुर्णी रस्त्यावरील देळेगव्हाण-गाडेगव्हाण शिवारात आज (२९ ऑगस्ट) पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास एक चारचाकी कार विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला.   या अपघातात किती जण मृत्युमुखी पडले याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नसली तरी पाच जणांचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.     मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई ( गुंगी ) ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर येथील डकले परिवार हे वाहनातून जात होते. अर्धांगवायूग्रस्त रुग्णाला सुलतानपूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना वाचविताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट विहिरीत जाऊन पडल्याचे सांगितले जाते.    घटनास्थळी पोलीस, तहसीलदार, तसेच स्थानिक प्रशासनाची यंत्रणा दाखल झाली असून क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत एक मृतदेह बा...

आंदोलनात सहभागी मराठा सेवकांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        मराठा आरक्षणासाठी चलो मुंबई आंदोलनात सहभागी झालेले वरपगाव (ता. केज, जि. बीड) येथील सतिष ज्ञानोबा देशमुख (वय ३८) यांचे जुन्नर येथे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच गावात तसेच मराठा समाजात हळहळ व्यक्त होत आहे      सतिषभाऊ आंदोलनात सक्रिय होते व समाजहितासाठी सदैव तत्पर होते. त्यांचे पार्थिव स्वगृही आणले जात असून कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.     चलो मुंबई आंदोलनात सहभागी झालेल्या बांधवांनी स्वतःच्या आरोग्याची आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, अशी आवाहन करण्यात येत आहे.

आझाद मैदान येथे आमरण उपोषणास परवानगी काय आहेत अटी

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथून निघालेल्या आमरण उपोषण आंदोलनाला अखेर मुंबईतील आझाद मैदान येथे सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील परवानगीपत्र आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांनी दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केले आहे. आंदोलनासाठी नियम व अटी     महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियमावली २०२५ नुसार आंदोलनास परवानगी देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार— आंदोलकांची संख्या कमाल ५ हजारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. आंदोलनाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अशी निश्चित करण्यात आली आहे. ध्वनीक्षेपक, गोंगाट करणारी साधने वा प्रचार यंत्रणा वापरण्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे. आंदोलनादरम्यान गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत कोणताही अडथळा येणार नाही याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे. लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृद्ध व्यक्तींना आंदोलनात सहभागी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलनादरम्यान अन्न...

गृहनिर्माण अभियंता लाचेच्या जाळ्यात

Image
घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यासाठी मागितली होती लाच  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पंचायत समितीचे कंत्राटी गृहनिर्माण अभियंता विशाल विठ्ठलराव कनोजे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (बुधवार) रंगेहाथ पकडले. तक्रारदाराकडून घरकुलाचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपये लाच घेत असताना ही कारवाई करण्यात आली.    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनोजे यास ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या