Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना -जिवंत व्यक्तीला मृत दाखवून ६.७८ लाखांचा अपहार - बनावट कामगार नोंदणी घोटाळ्याचा पर्दाफाश

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        शासनाच्या कामगार कल्याण योजनेतील निधी अपहाराचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ६ लाख ७८ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला असून, याप्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती मिळाली. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, कामगार नोंदणी प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची व्याप्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. फसवणुकीचा प्रकार कसा उघड झाला?       छत्रपती संभाजीनगर येथील कामगार विभागाचे सरकारी अधिकारी गोविंद गावंडे यांनी या प्रकरणाची तक्रार मंठा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. गावंडे व त्यांच्यासोबतच्या दक्षता पथकाने आकणी गावात प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली असता, स्वाती शिवाजी उबाळे, देवराव नारायण बदर आणि दुर्योधन रामभाऊ जाधव यांच्या नावाने सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.      ग्रामसेवक खेडकर यांनी स्पष्ट केले की, संबंधित तिघे आकणी गावचे रहिवासी नाहीत आणि ग्रामपंचायतीकडून कोणत...

घनसावंगी - अपहरण व खून प्रकरणातील चारही आरोपींना वाहनासह अटक

Image
आरोपींनी सुरेश तुकाराम आर्दड याचे अपहरण करून खून केल्याची कबुली | गेवराई (बीड) येथून सर्व आरोपींना ताब्यात वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      दिनांक २८ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कुंभार पिंपळगाव येथे घडलेल्या शोकांतिक अपहरण व खून प्रकरणात घनसावंगी पोलिसांनी दि ४ जुलै रोजी फरार चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी सुरेश तुकाराम आर्दड (रा. राजाटाकळी, ता. घनसावंगी) याचे जुन्या वैयक्तिक वादातून अपहरण करून नंतर खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेचा क्रमवार तपशील       दिनांक २८ जून रोजी रात्रीच्या सुमारास, आरोपींनी एकत्र येऊन कट रचला. त्यांनी गावठी कट्टा व कुऱ्हाडीचा धाक दाखवत सुरेश आर्दड याला जबरदस्तीने एका पांढऱ्या चारचाकी वाहनात बसवून अपहरण केले. यावरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.  २९ जून रोजी सकाळी ११ वाजता, पोलिसांना माहिती मिळाली की पोलीस ठाणे किनगाव राजा (बुलढाणा) हद्दीतील तळेगाव शिवारातील रस्त्यालगत एका अनोळखी पुरुषाची प्रेत आढळून आली आहे. वर्णन मिळतेजुळते असल्यामुळे तपास पथकाने नातेवाईकांना पाठवून प्रेताची ओळख...

पंढरपूरला पायी निघालेल्या अंबड तालुक्यातील वारकऱ्याचा मृत्यू

Image
हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडीत सहभागी झालेल्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहीलागड येथील एक वारकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना सोमवारी घडली.       मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर लिंबाजी पाटील (वय ५५) हे वारकरी संप्रदायातील निष्ठावान भक्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी जाणाऱ्या माऊलीच्या दिंडीत नियमितपणे सहभागी होत असत. यंदाही पंढरपूरच्या दिशेने दिंडीत सहभागी होऊन ते मार्गस्थ होते.      सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नातेपुते पाटी या ठिकाणी दिंडी सुरु असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थित वारकऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्काळ उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.      या घटनेची माहिती मिळताच पाटील यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकरी थेट नातेपुते येथे पोहोचले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मूळगाव र...

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना DBT पोर्टलद्वारे १५ कोटींचा निधी मिळणार

Image
कोणत्या तालुक्याला किती मिळणार रक्कम  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शासनाकडून डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पोर्टलद्वारे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये वित्तीय मदतीचा निधी वितरीत केला जाणार आहे. याबाबतची  निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.     त्यानुसार, एकूण 9,277 शेतकऱ्यांना तब्बल 15 कोटी 90 लाख 99 हजार 88 रुपये इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. तालुकानिहाय निधीचे वितरण पुढीलप्रमाणे होणार आहे परतुर तालुका – 213 शेतकरी : ₹27,45,099 मंठा तालुका – 570 शेतकरी : ₹67,25,789 जालना तालुका – 347 शेतकरी : ₹30,79,392 जाफ्राबाद तालुका – 512 शेतकरी : ₹53,90,000 घनसावंगी तालुका – 1,717 शेतकरी : ₹2,54,05,090 भोकरदन तालुका – 131 शेतकरी : ₹21,10,671 बदनापूर तालुका – 55 शेतकरी : ₹8,41,874 अंबड तालुका – 5,732 शेतकरी : ₹11,28,01,146      यामध्ये अंबड तालुका आघाडीवर असून सर्वाधिक ...

आषाढी वारीत दुर्दैवी घटना: अंबड तालुक्यातील युवक नदीत बुडाला !

Image
संत तुकाराम महाराज पालखी दिंडीतला युवक निरा नदीत बुडाला; माजी मंत्री राजेश टोपे यांनी घेतली घटनास्थळी भेट वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी क्रमांक १२ अंतर्गत सहभागी असलेल्या गोविंद कल्याणराव फोके (वय अंदाजे १७) या युवकाचा निरा नदीत बुडाल्याची घटना आज मंगळवारी घडली.    गोविंद फोके हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी असून, तो आपल्या आजीबरोबर मस्के महाराज दिंडी क्रमांक १२ सोबत आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाला होता. सराटी पुलाजवळील निरा नदीत आंघोळीसाठी उतरलेला असताना तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. माजीमंत्री राजेश टोपे यांची भेट        या संपूर्ण घटनेची दखल घेत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी फोनवरून संवाद साधून शोधमोहीम तातडीने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या.       सध्या परिसरात आपत्ती व्यवस्थापनाचे पथक, पोलीस व स्थानिक स्वयंसेवक युवकाचा शोध घेत आह...

मराठा राज्यव्यापी बैठक: आंतरवाली सराटीतून मुंबई आंदोलनाची हाक

Image
लाखोंच्या उपस्थितीत ऐतिहासिक बैठक; मनोज जरांगे पाटलांचा एल्गार वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        २९ जून २०२५ रोजी आंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा समाजाच्या नियोजनासाठी एक भव्य व ऐतिहासिक राज्यव्यापी बैठक पार पडली. लाखोंच्या संख्येने उपस्थित मराठा बांधवांनी ही सभा मराठा एकजुटीचा शक्तिप्रदर्शन ठरवली. या बैठकीतून समाजाने आगामी मुंबई आंदोलनासाठी रणनिती ठरवली असून, आंदोलनाच्या नेतृत्वाची धुरा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा समर्थपणे सांभाळली. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व संदेश    मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणातून मराठा समाजाच्या लढ्याची दिशा स्पष्ट केली: "इतके दिवस आंदोलन चालू असतानाही मराठा समाज मागे हटलेला नाही. ही चिकाटीच आपल्या विजयाचे कारण ठरणार आहे," असे ते म्हणाले. "व्हाट्सॲप, फेसबुकवर पाठिंबा देण्याची वेळ संपली आहे. आता थेट मैदानात उतरण्याची वेळ आली आहे." "२७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आंतरवाली सराटीहून निघून, २९ ऑगस्ट रोजी कोट्यवधी मराठ्यांसह मुंबईत दाखल होणार आहोत." "राजकारणी निवडणूक जिंकण्यासाठी झटतात, पण समाजास...

घनसावंगी- युवकाचे अपहरण; गावठी कट्टा व कु-हाडीचा धाक दाखवत केले अपहरण

Image
  जुन्या वादाच्या कारणावरून केले अपहरण  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बाजार समितीसमोर काल रात्री १० वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादाच्या कारणावरून एका युवकाचे चार जणांच्या टोळीने गावठी कट्टा आणि कु-हाडीचा धाक दाखवत अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.      फिर्यादी सुभाष लळितराव आर्दड ( रा. राजाटाकळी, ता. घनसावंगी) यांच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.यातील संशयित आरोपी हरी तौर याने गावठी कट्ट्याचा धाक दाखवला, तर खन्ना आर्दड याने कु-हाडीने धमकावले. त्यानंतर जबरदस्तीने त्याला गाडीत बसवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अज्ञात ठिकाणी घेऊन गेले.असे तक्रारीत म्हटले आहे.     घटनेनंतर लगेचच पोलीस निरीक्षक राठोड, सपोनि खरात, पोउपनि पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध सुरू आहे. अद्याप कोणत्याही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या