अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

आषाढी वारीत दुर्दैवी घटना: अंबड तालुक्यातील युवक नदीत बुडाला !

संत तुकाराम महाराज पालखी दिंडीतला युवक निरा नदीत बुडाला; माजी मंत्री राजेश टोपे यांनी घेतली घटनास्थळी भेट


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी क्रमांक १२ अंतर्गत सहभागी असलेल्या गोविंद कल्याणराव फोके (वय अंदाजे १७) या युवकाचा निरा नदीत बुडाल्याची घटना आज मंगळवारी घडली.



   गोविंद फोके हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी असून, तो आपल्या आजीबरोबर मस्के महाराज दिंडी क्रमांक १२ सोबत आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाला होता. सराटी पुलाजवळील निरा नदीत आंघोळीसाठी उतरलेला असताना तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

माजीमंत्री राजेश टोपे यांची भेट 

      या संपूर्ण घटनेची दखल घेत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी फोनवरून संवाद साधून शोधमोहीम तातडीने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. 

     सध्या परिसरात आपत्ती व्यवस्थापनाचे पथक, पोलीस व स्थानिक स्वयंसेवक युवकाचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेमुळे संत तुकाराम महाराज पालखीतील व सर्वच वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

    मात्र ४:३० वाजेपर्यंत पोलिस व ग्रामस्थ सोडता इतर आपत्ती व्यवस्थापनाचे पथक दाखल झालेले नव्हते अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली.

    दरम्यान पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे युवा व युवती तसेच सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दिंडीत जाणाऱ्या भाविक भक्तांनी पाणी, रस्ता, वाहतूक, आपली वाहने, नदी आदी ठिकाणी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या