अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

पंढरपूरला पायी निघालेल्या अंबड तालुक्यातील वारकऱ्याचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडीत सहभागी झालेल्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहीलागड येथील एक वारकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना सोमवारी घडली.

      मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर लिंबाजी पाटील (वय ५५) हे वारकरी संप्रदायातील निष्ठावान भक्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी जाणाऱ्या माऊलीच्या दिंडीत नियमितपणे सहभागी होत असत. यंदाही पंढरपूरच्या दिशेने दिंडीत सहभागी होऊन ते मार्गस्थ होते.

     सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नातेपुते पाटी या ठिकाणी दिंडी सुरु असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थित वारकऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्काळ उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

     या घटनेची माहिती मिळताच पाटील यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकरी थेट नातेपुते येथे पोहोचले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मूळगाव रोहीलागड येथे मंगळवारी (दि. १ जुलै) सकाळी गावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. पाटील कुटुंबीयांवर ही अपूरणीय दुःखाची वेळ कोसळली असून परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी कुटुंबीयांना धीर दिला आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या