Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालन्यातील सरकारी अनुदान घोटाळा: महसूल खात्यातील आणखी ११ जण निलंबित

Image
  जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांची कारवाई  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या सरकारी अनुदान घोटाळ्याप्रकरणी महसूल विभागातील आणखी ११ अधिकारी/कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीच सात तलाठ्यांना निलंबित करण्यात आले असून, आता जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशाने ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घोटाळ्याच्या तपासाअंती जिल्हा प्रशासनाने याआधीच ५ तहसीलदार, ६ नायब तहसीलदारांकडून खुलासे मागवले होते. तर ३५ तलाठ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील उर्वरित १६ पैकी ४ कर्मचाऱ्यांवर आणि नव्याने तपासात दोषी आढळलेल्या ७ कर्मचाऱ्यांवर मिळून एकूण ११ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे  1 डी. जी. कुरेवाड ग्राम महसूल अधिकारी सो. पिंपळगाव अंबड 2 सचिन बागुल ग्राम महसूल अधिकारी डोमेगाव अंबड 3 राजू शेख ग्राम महसूल अधिकारी तिर्थपुरी घनसावं...

मल्टीस्टेट मधील रक्कम परत न मिळाल्याने गेटला फाशी घेऊन आयुष्य संपवल

Image
  सिर सालामत तो पगडी पचास; आत्महत्या हा पर्याय नव्हे- वास्तव न्यूज मराठीचे आवाहन वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       महाराष्ट्रातील काही मल्टीस्टेट बँकांचे वाढते घोटाळे आणि ठेवीदारांची फसवणूक यामुळे अनेक कुटुंबांवर दुर्दैवी परिणाम होत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात समोर आली आहे. छत्रपती मल्टीस्टेट बँकेमध्ये आपली ११ लाख रुपयांची ठेवी/खात्यातील अडकलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे शेतकरी सुरेश आत्माराम जाधव (वय अंदाजे ५०, रा. खळेगाव) यांनी बँकेच्या गेटलाच फाशी घेऊन आत्महत्या केली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.      मिळालेल्या माहितीनुसार जाधव यांनी स्वतःची शेती विकून छत्रपती मल्टीस्टेटमध्ये ११ लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ५ लाख, असे एकूण १६ लाख रुपये गुंतवले होते. त्यांची मोठी मुलगी विवाह योग्य वयाची झाली होती आणि लग्नासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता होती. मात्र, सातत्याने बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना आपली ठेवी/खात्यातील पैसे परत मिळाल्या नाहीत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेली आश्वासने आणि केलेली टोलवाटोलवी या...

ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

जालन्यात दुर्दैवी घटना: पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Image
  जांभूळ खाण्यासाठी गेले अन् परत आलेच नाही... वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालन्यात आज एक दुर्दैवी घटना समोर आलीय यात गावाजवळील नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.     जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव देवी गावात शुक्रवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गावाजवळ असलेल्या एका नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.     मृत्यू झालेल्या मुलांची नावे कुणाल राहुल खरात (वय १० वर्षे) आणि युवराज गौतम खरात (वय ९ वर्षे) अशी असून ते दोघे सख्खे चुलत भाऊ होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडले होते. त्यांनी निघताना घरच्यांना जांभळं खाण्याचा बहाणा दिला होता. त्यानंतर त्यांनी गावाजवळ असलेल्या एका लहानशा तलावात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांना पोहता न आल्याने ते पाण्यात बुडाले.     घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावक...

एसटी पास थेट शाळेत : १६ जूनपासून राज्यभरात विद्यार्थ्यांसाठी नवी सुविधा

Image
  एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजना.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या १६ जूनपासून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव योजना राबविणार आहे – ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’. या योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना एसटीचा पास मिळवण्यासाठी आगार कार्यालयात धावपळ करण्याची गरज भासणार नाही. एसटीचे पास थेट संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्येच वितरित केले जाणार आहेत.    परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. या उपक्रमामुळे वेळ आणि श्रम वाचणार असून विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे अधिक भर राहील.    या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एसटी महामंडळाच्या सर्व आगार व्यवस्थापकांना आपल्या कार्यक्षेत्रातील मुख्याध्यापक व प्राचार्यांशी संपर्क करून त्यांच्याकडून पाससाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याम...

जालन्यात शेतकऱ्याच्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी भव्य निदर्शने आंदोलन

Image
  जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ जूनला भव्य निदर्शने आंदोलन वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या झालेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी १६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे भव्य निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.     हा शेतकरी घनसावंगी तालुक्यातील असून काल जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या असताना घडली. या वेळी घनसावंगी तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिल्ह्यातील २६ तलाठ्यांनी केलेल्या ३५ कोटी रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यावर कारवाई व्हावी, यासाठी निवेदन देण्यासाठी तो शांततेत उभा होता. मात्र, पोलिसांनी त्या शेतकऱ्याला अर्वाच्य भाषेत धमकावत, जमिनीवर ढकलून दिले आणि त्याच्या शर्टाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.     या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आ...

पुणे हादरलं! नदीवरील पूल कोसळला-६ जणांचा मृत्यू, २५ बेपत्ता

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        मावळ तालुक्यातील कुडमळा येथे आज रविवारी एक भीषण आणि दुर्दैवी घटना घडली. इंद्रायणी नदीवरील पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलीस, आणि आपत्ती व्यवस्थापन दल बचावकार्य करत असून, २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.     रविवार सुट्टी असल्याने अनेक पर्यटक नदीकाठी पर्यटनासाठी आले होते. नदीच्या काठावर आणि पुलावर पर्यटकांचा मोठा जमाव असताना अचानक पूल कोसळल्याने अनेकजण थेट पाण्यात पडले. जोरदार पावसामुळे नदीला पूर आला होता, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली.     स्थानिक ग्रामस्थांनी आणि आपत्कालीन सेवांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. अद्यापही अनेकजण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. मुख्य बाबी घटना रविवारी दुपारी सुमारे ३ ते ४ दरम्यान घडली पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती पूल कोसळताच अ...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या