घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालन्यात शेतकऱ्याच्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी भव्य निदर्शने आंदोलन

 जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ जूनला भव्य निदर्शने आंदोलन


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     जालना जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या झालेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी १६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे भव्य निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

    हा शेतकरी घनसावंगी तालुक्यातील असून काल जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या असताना घडली. या वेळी घनसावंगी तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिल्ह्यातील २६ तलाठ्यांनी केलेल्या ३५ कोटी रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यावर कारवाई व्हावी, यासाठी निवेदन देण्यासाठी तो शांततेत उभा होता. मात्र, पोलिसांनी त्या शेतकऱ्याला अर्वाच्य भाषेत धमकावत, जमिनीवर ढकलून दिले आणि त्याच्या शर्टाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली.

    या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लोकशाहीत नागरिकांना निवेदन देण्याचा हक्क असूनही, पोलिसांकडून शेतकऱ्याच्या झालेल्या अपमानास अनेकांनी निषेध नोंदवला आहे. "साहेब, शेतकऱ्याची कॉलर धरली, हरकत नाही… गोळ्या नाही घातल्या, त्याबद्दल उपकार मानतो," अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथेला वाचा फोडली आहे.

   या घटनेवर प्रतिक्रिया देताना शेतकरी म्हणाले, "सरकारला आमचं काही देणंघेणं नाही. आम्ही संवैधानिक मार्गाने निवेदन दिलं तरी आमच्यावरच अन्याय. तलाठ्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला, आणि आमच्यावर पोलिसांचा अन्याय – हीच सत्तेची विकृती आहे."या संपूर्ण प्रकारातून केवळ एका शेतकऱ्याचा नव्हे, तर संपूर्ण शेतकरी समाजाचा अपमान झाला आहे. लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटणाऱ्या या घटनेविरोधात एकजुटीने आवाज उठवणे आवश्यक आहे, असे आंदोलनकर्त्यांचे मत आहे.

   १६ जून रोजी होणाऱ्या या आंदोलनात सर्व शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असा पुन्हा एकदा जोरदार आग्रह करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या