अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालन्यातील सरकारी अनुदान घोटाळा: महसूल खात्यातील आणखी ११ जण निलंबित

 जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांची कारवाई 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     जालना जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या सरकारी अनुदान घोटाळ्याप्रकरणी महसूल विभागातील आणखी ११ अधिकारी/कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीच सात तलाठ्यांना निलंबित करण्यात आले असून, आता जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशाने ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

 सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घोटाळ्याच्या तपासाअंती जिल्हा प्रशासनाने याआधीच ५ तहसीलदार, ६ नायब तहसीलदारांकडून खुलासे मागवले होते. तर ३५ तलाठ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील उर्वरित १६ पैकी ४ कर्मचाऱ्यांवर आणि नव्याने तपासात दोषी आढळलेल्या ७ कर्मचाऱ्यांवर मिळून एकूण ११ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे 

1 डी. जी. कुरेवाड ग्राम महसूल अधिकारी सो. पिंपळगाव अंबड

2 सचिन बागुल ग्राम महसूल अधिकारी डोमेगाव अंबड

3 राजू शेख ग्राम महसूल अधिकारी तिर्थपुरी घनसावंगी

4  एस. एस. कुलकर्णी ग्राम महसूल अधिकारी सजा बाजीउम्रद जालना

5  ज्योती खर्जुले मंडळ अधिकारी कुंभारझरी जाफ्राबाद

6 एस. एम. जारवाल ग्राम महसूल अधिकारी बोधलापुरी घनसावंगी


7  डी. जी. चांदमारे ग्राम महसूल अधिकारी मुर्ती घनसावंगी


8 आर. बी. माळी सहायक महसूल अधिकारी तहसील कार्यालय मंठा


9 आशिष पैठणकर सहायक महसूल अधिकारी तहसील कार्यालय घनसावंगी


10 व्ही. डी. ससाने महसूल सहायक तहसील कार्यालय घनसावंगी


11 सुशिल जाधव सहायक महसूल अधिकारी तहसील कार्यालय अंबड / घनसावंगी

    जिल्हा प्रशासनाने सादर केलेला अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून, या प्रकरणी अन्य दोषींवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. या मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे संपूर्ण महसूल प्रशासनावरच संशयाची सुई फिरत आहे.

    जालना जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Comments

  1. माझी एक रस्ता प्रकरण असेच भ्रस्टाचार कृत वादी याच्या शी संघनमत करून अंबड तहसीलदार यांच्या कोर्टात निकाली काढले त्याची तक्रार मे. लोकांयुक्त कार्यालय मुंबई दि. 10/6/2025 ला येथे केली आहे

    ReplyDelete
  2. वरील प्रकरण मौजे हसनापूर ता. अंबड जि. जालना येथील गट न. 80, 81 रस्ता प्रकरण आहे..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog