जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांची कारवाई
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या सरकारी अनुदान घोटाळ्याप्रकरणी महसूल विभागातील आणखी ११ अधिकारी/कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीच सात तलाठ्यांना निलंबित करण्यात आले असून, आता जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशाने ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घोटाळ्याच्या तपासाअंती जिल्हा प्रशासनाने याआधीच ५ तहसीलदार, ६ नायब तहसीलदारांकडून खुलासे मागवले होते. तर ३५ तलाठ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील उर्वरित १६ पैकी ४ कर्मचाऱ्यांवर आणि नव्याने तपासात दोषी आढळलेल्या ७ कर्मचाऱ्यांवर मिळून एकूण ११ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे
1 डी. जी. कुरेवाड ग्राम महसूल अधिकारी सो. पिंपळगाव अंबड
2 सचिन बागुल ग्राम महसूल अधिकारी डोमेगाव अंबड
3 राजू शेख ग्राम महसूल अधिकारी तिर्थपुरी घनसावंगी
4 एस. एस. कुलकर्णी ग्राम महसूल अधिकारी सजा बाजीउम्रद जालना
5 ज्योती खर्जुले मंडळ अधिकारी कुंभारझरी जाफ्राबाद
6 एस. एम. जारवाल ग्राम महसूल अधिकारी बोधलापुरी घनसावंगी
7 डी. जी. चांदमारे ग्राम महसूल अधिकारी मुर्ती घनसावंगी
8 आर. बी. माळी सहायक महसूल अधिकारी तहसील कार्यालय मंठा
9 आशिष पैठणकर सहायक महसूल अधिकारी तहसील कार्यालय घनसावंगी
10 व्ही. डी. ससाने महसूल सहायक तहसील कार्यालय घनसावंगी
11 सुशिल जाधव सहायक महसूल अधिकारी तहसील कार्यालय अंबड / घनसावंगी
जिल्हा प्रशासनाने सादर केलेला अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून, या प्रकरणी अन्य दोषींवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. या मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे संपूर्ण महसूल प्रशासनावरच संशयाची सुई फिरत आहे.
जालना जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
माझी एक रस्ता प्रकरण असेच भ्रस्टाचार कृत वादी याच्या शी संघनमत करून अंबड तहसीलदार यांच्या कोर्टात निकाली काढले त्याची तक्रार मे. लोकांयुक्त कार्यालय मुंबई दि. 10/6/2025 ला येथे केली आहे
ReplyDeleteवरील प्रकरण मौजे हसनापूर ता. अंबड जि. जालना येथील गट न. 80, 81 रस्ता प्रकरण आहे..
ReplyDelete👍
ReplyDelete