घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

एसटी पास थेट शाळेत : १६ जूनपासून राज्यभरात विद्यार्थ्यांसाठी नवी सुविधा

 एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजना..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या १६ जूनपासून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव योजना राबविणार आहे – ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’. या योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना एसटीचा पास मिळवण्यासाठी आगार कार्यालयात धावपळ करण्याची गरज भासणार नाही. एसटीचे पास थेट संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्येच वितरित केले जाणार आहेत.

   परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या योजनेचा लाभ राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. या उपक्रमामुळे वेळ आणि श्रम वाचणार असून विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे अधिक भर राहील.

   या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एसटी महामंडळाच्या सर्व आगार व्यवस्थापकांना आपल्या कार्यक्षेत्रातील मुख्याध्यापक व प्राचार्यांशी संपर्क करून त्यांच्याकडून पाससाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची माहिती आगोदरच संकलित होऊन पास वाटप सुलभपणे करता येणार आहे.

या उपक्रमाचे मुख्य फायदे

विद्यार्थ्यांना आगारात जाऊन रांगेत उभे राहावे लागणार नाही.

शाळा/महाविद्यालयातच पास मिळणार असल्याने वेळ वाचणार.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः उपयुक्त.

शाळा व एसटी यामधील समन्वय अधिक बळकट होणार.

 राज्य परिवहन विभागाने योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे. ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही योजना विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या