घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव देवी गावात शुक्रवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गावाजवळ असलेल्या एका नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मृत्यू झालेल्या मुलांची नावे कुणाल राहुल खरात (वय १० वर्षे) आणि युवराज गौतम खरात (वय ९ वर्षे) अशी असून ते दोघे सख्खे चुलत भाऊ होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडले होते. त्यांनी निघताना घरच्यांना जांभळं खाण्याचा बहाणा दिला होता. त्यानंतर त्यांनी गावाजवळ असलेल्या एका लहानशा तलावात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांना पोहता न आल्याने ते पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. कुणाल आणि युवराज हे दोघे सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास गावालगतच्या ओढ्यात मृत अवस्थेत तरंगताना आढळून आले. त्यावेळी उपस्थित असलेले सर्व गावकरी, कुटुंबीय आणि नातेवाईक यांना शोक अनावर झाला.
या घटनेबाबत राजेंद्र भिमराव खरात यांनी पोलिस ठाण्यात तोंडी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दुपारी सुमारे ४ वाजता त्यांना गौतम दगडू खरात यांचा फोन आला आणि युवराज व कुणाल हे त्यांच्या घरी आले आहेत का, अशी विचारणा झाली. त्यानंतर शोध घेऊन ओढ्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment