घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
मिळालेल्या माहितीनुसार जाधव यांनी स्वतःची शेती विकून छत्रपती मल्टीस्टेटमध्ये ११ लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ५ लाख, असे एकूण १६ लाख रुपये गुंतवले होते. त्यांची मोठी मुलगी विवाह योग्य वयाची झाली होती आणि लग्नासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता होती. मात्र, सातत्याने बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना आपली ठेवी/खात्यातील पैसे परत मिळाल्या नाहीत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेली आश्वासने आणि केलेली टोलवाटोलवी यामुळे ते मानसिक तणावात गेले.
मंगळवारी रात्री उशिरा जाधव हे आपल्या कुटुंबासोबत गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेटच्या शाखेत पोहोचले. मात्र, तेथेही त्यांना कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. तणावाच्या टोकाला पोहोचलेले जाधव यांनी शेवटी रात्रीच बँकेच्या गेटवर दोरी लावून फाशी घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, परिसरात संतापाची लाट उसळली असून बँक अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. छत्रपती मल्टीस्टेट आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकांवरील कारवाईचीही जोरदार मागणी होत आहे.
या घटनेनंतर सहकारी पतसंस्थांवरील जनतेचा विश्वास ढासळत चालला आहे. बँकांवर विश्वास ठेवून ठेवी करणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊन त्यांना जीव गमवावा लागतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यातील काही मल्टीस्टेट घोटाळ्यांमुळे अनेक ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यात ज्ञानराधा मल्टीस्टेट आघाडीवर दिसते. मात्र, 'आत्महत्या' हे या समस्येचे उत्तर नाही. ‘सिर सालामत तो पगडी पचास’ या उक्तीनुसार, जीव वाचला तर संधी राहते, लढाई शक्य होते. आपल्या जीवनाची किंमत पैशापेक्षा जास्त आहे.
सर्व ठेवीदार आणि खातेदारांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेऊ नये. आपल्या हक्कासाठी कायदेशीर मार्गाने लढा द्या. बँकांवर, प्रशासनावर दबाव टाका, पण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनाशी खेळू नका. पैसे आपल्यासाठी आहे आपण पैशासाठी नव्हे हे विशेष करून लक्षात घेऊ.
Comments
Post a Comment