घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

पुणे हादरलं! नदीवरील पूल कोसळला-६ जणांचा मृत्यू, २५ बेपत्ता

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     मावळ तालुक्यातील कुडमळा येथे आज रविवारी एक भीषण आणि दुर्दैवी घटना घडली. इंद्रायणी नदीवरील पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलीस, आणि आपत्ती व्यवस्थापन दल बचावकार्य करत असून, २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    रविवार सुट्टी असल्याने अनेक पर्यटक नदीकाठी पर्यटनासाठी आले होते. नदीच्या काठावर आणि पुलावर पर्यटकांचा मोठा जमाव असताना अचानक पूल कोसळल्याने अनेकजण थेट पाण्यात पडले. जोरदार पावसामुळे नदीला पूर आला होता, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली.

    स्थानिक ग्रामस्थांनी आणि आपत्कालीन सेवांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. अद्यापही अनेकजण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.


मुख्य बाबी

घटना रविवारी दुपारी सुमारे ३ ते ४ दरम्यान घडली

पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती

पूल कोसळताच अनेकजण थेट नदीत पडले

प्रशासन, पोलीस आणि NDRF यांचे संयुक्त बचावकार्य सुरू

बेपत्ता पर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये हळहळ आणि अस्वस्थता

    मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसर सील करून वाहतूक बंद केली आहे. पूल कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार पूल जुनाट आणि दुर्लक्षित अवस्थेत होता. ही घटना पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करते.

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत सांगितले की प्राथमिक माहितीनुसार २ लोकांचा मृत्यू झाला आहे.

   विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व संबधित तहसीलदार यांच्याशी सातत्याने संपर्कात असल्याचे असून काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे.

   आतापर्यंत सहा जणांना वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३२ लोक जखमी असून त्यापैकी ६ गंभीर आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत असे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या