Posts

ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी

Image
१० जून २०२५ रोजी महसूल विभागाचा निर्णय वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात शासन आदेश क्रमांक बदली-२०२५/प्र.क्र.८४/ई-३ अन्वये तातडीने अंमलात येणारा निर्णय घेतला आहे. बदल्यांचा उद्देश सार्वजनिक सेवेच्या हितार्थ आणि प्रशासकीय सोयीसाठी करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशात खालील बदल्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत  मुख्य बदल्या क्र. अधिकाऱ्याचे नाव सध्याची पदस्थापना बदलीनंतरची पदस्थापना 1. श्री. सतीश सोनी नियुक्तीच्या प्रतिक्षेत तहसिलदार, सिल्लोड (जि. छ. संभाजीनगर) 2. श्रीमती तेजस्विनी पाटील तहसिलदार (महसूल), जि.का. रत्नागिरी तहसिलदार (संगायो), अंधेरी 3. श्रीमती स्मिता पवार तहसिलदार (संगायो), जि.का. सातारा तहसिलदार (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे 4. श्रीमती रोहीणी शिंदे तहसिलदार (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे तहसिलदार (संगायो), जि.का. सातारा 5. श्री. संजय पांडुरंग भोसले तहसिलदार, सिल्लोड तहसिल...

जालन्यात हृदयद्रावक घटना-विजेचा धक्का लागून शेतकरी व दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालन्यात आज मंगळवारी वटसावित्रीच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर येत असून विजेचा धक्का लागून शेतात शेतकरी व दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय.     जालना तालुक्यातील वरुड गावात वटसावित्रीच्या दिवशी घडलेली एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शेतीकाम करत असताना विजेचा धक्का बसून वडिलांसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.     मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे विनोद तुकाराम मस्के (वडील), श्रद्धा मस्के (वय ७) आणि समर्थ मस्के (वय ५) अशी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, विनोद मस्के हे आपल्या शेतात मल्चिंग पेपर अंथरण्याचे काम करत असताना, शेतातून गेलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे त्यांना जोरदार विजेचा शॉक बसला. या घटनेची तीव्रता इतकी होती की, त्याचवेळी जवळ उभे असलेली त्यांची दोन चिमुकली मुलेही या शॉकच्या संपर्कात आली आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला.     ही दुर्घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ सर्वांन...

पैठणहून परतताना दोन दुचाकीचा भीषण अपघात: एक ठार, दोन जखमी

Image
एकादशी निमित्त पैठणहून दर्शन करून परतणाऱ्या भाविकावर काळाचा घाला  वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण       जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आज (७ जून) एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. एकादशी निमित्त पैठणहून दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या दोन दुचाकींमध्ये चिंचखेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शरद निवृत्ती वाघुंडे (वय अंदाजे ४५, रा. ताड हातगाव, ता. अंबड) यांचे जागेवरच निधन झाले असून दोन भाविक जखमी झाले आहेत. अशी प्राथमिक माहिती मिळाली. दर्शनातून परतताना घडली दुर्घटना     आज एकादशीच्या दिवशी ताड हातगाव येथील काही भाविक पैठण येथे श्री एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या मार्गावर चिंचखेड फाट्याजवळ दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की शरद वाघुंडे यांना गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला. अपघातामुळे दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान    या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी भाविकांना तातडीने अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर...

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शुल्क परतफेड आणि निर्वाह भत्ता योजनांसाठी प्रत्येक महाविद्यालयात नोडल अधिकारी

Image
  उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्काची परतफेड, निर्वाह भत्ता यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ वेळेत व प्रभावीपणे मिळावा यासाठी प्रत्येक महाविद्यालयात नोडल अधिकारी म्हणून प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.     राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) च्या अंमलबजावणी संदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सुकानु समितीचे प्रमुख डॉ. नितीन करमळकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख शासकीय विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते.     बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील अडचणी, उपाययोजना आणि विद्यार्थी केंद्रित योजनांची अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्या...

महाराष्ट्र शासनाकडून “माझी जमीन माझा हक्क” अभियानासाठी उच्चस्तरीय समिती गठीत

Image
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत भूमी अधिकार सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत “माझी जमीन माझा हक्क” या राज्यव्यापी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. समितीची रचना     या समितीचे अध्यक्ष म्हणून जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह महसूल आयुक्त कार्यालयातील उपायुक्त, महसूल व वन विभागातील सह सचिव, तसेच सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. समितीमध्ये एकूण १० सदस्य असून त्यामध्ये खालील प्रमुख सदस्यांचा समावेश आहे: जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख – अध्यक्ष उपायुक्त, सर्व महसूल आयुक्त कार्यालय – सदस्य श्रीमती मनिषा जायभाये, सह सचिव – सदस्य श्री. सत्...

स्टॅम्पपेपरशिवाय शपथपत्र – नियमबाह्य मागणी थांबवा! सरकारचा स्पष्ट आदेश

Image
आता शपथपत्रासाठी कोणत्याही प्रकारच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच विविध न्यायालयीन बाबींशी संबंधित सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपरची अट आता रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच, आता शपथपत्रासाठी कोणत्याही प्रकारच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. सरकारचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी     हा निर्णय मागील दोन महिन्यांपासून लागू असून, यामुळे विद्यार्थी, पालक, शेतकरी तसेच इतर सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनावश्यक आर्थिक बोजा टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून, शपथपत्रे ही आता फक्त साध्या कागदावरही वैध मानली जाणार आहेत. काही कार्यालयांकडून नियमबाह्य वसुली     तरीदेखील राज्यातील काही शासकीय कार्यालये, विशेषतः ई-सेवा केंद्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी तसेच न्यायालयीन कामकाजासाठी अजूनही नागरिकांकडून 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प...

आरटीओ वायू वेग पथकाची मोठी कारवाई; ३८ वाहतूक वाहनांवर धडक तपासणी, साडे पाच लाखांचा दंड

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात आरटीओच्या वायू वेग पथकाने मोठी कारवाई केली आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली ६ जून २०२५ रोजी गोंदी, पाथरवाला बु., पाचोड शहागड, मंठा, हसनाबाद व राजूर या भागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान एकूण ३८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल ₹५,४८,०००/- इतका दंड वसूल करण्यात आला.     ही तपासणी विशेषतः अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा व टिप्पर वाहनांवर केंद्रित होती. तपासणीदरम्यान खालील नियमभंगांवर कारवाई करण्यात आली: - भार क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहणारी वाहने - विनापरवाना धावणारी वाहने - विना नोंदणी क्रमांक असलेली वाहने - विमारहित व कालबाह्य फिटनेस प्रमाणपत्र असलेली वाहने - रस्त्यावर सुरक्षेला धोका ठरणारे चमकदार (dazzling) लाईट्स व विना रिफ्लेक्टर वाहने - विशेष म्हणजे, अधिक वाळू वाहतूक करणारी ३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.    ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक भीमराज ...

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!