ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

पैठणहून परतताना दोन दुचाकीचा भीषण अपघात: एक ठार, दोन जखमी

एकादशी निमित्त पैठणहून दर्शन करून परतणाऱ्या भाविकावर काळाचा घाला 


वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण

     जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आज (७ जून) एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. एकादशी निमित्त पैठणहून दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या दोन दुचाकींमध्ये चिंचखेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शरद निवृत्ती वाघुंडे (वय अंदाजे ४५, रा. ताड हातगाव, ता. अंबड) यांचे जागेवरच निधन झाले असून दोन भाविक जखमी झाले आहेत. अशी प्राथमिक माहिती मिळाली.

दर्शनातून परतताना घडली दुर्घटना

    आज एकादशीच्या दिवशी ताड हातगाव येथील काही भाविक पैठण येथे श्री एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या मार्गावर चिंचखेड फाट्याजवळ दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की शरद वाघुंडे यांना गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला.

अपघातामुळे दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान

   या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी भाविकांना तातडीने अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

   शरद वाघुंडे यांच्या आकस्मिक निधनामुळे ताड हातगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!