Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड

Image
नाशिक न्यायालयाचा मोठा निकाल   नाशिक जिल्हा न्यायालयाने अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कागदपत्र फेरफारप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला असून, विरोधकांनी सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. समर्थकांमध्ये नाराजी तर विरोधकांमध्ये आनंदाची लाट आहे. नेमकं काय आहे प्रकरण?   सदर प्रकरण १९९५ सालचे आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले होते. तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली होती. आरोपांमध्ये भादंवि कलम ४२०, ४६५, ४७१ व ४७४ आदी कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. २९ वर्षांनंतर निकाल: शिक्षा आणि दंड   या प्रकरणाचा निकाल तब्बल २९ वर्षांनंतर लागला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोषी ठरवत २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. राजकीय वातावरण तापले, सरकारची भूमिका काय?   न...

अनोखा शिवजन्मोत्सव मुस्लिम समाज बांधवांकडून शिवप्रतिमेचे पूजन – १९८८ पासून चालू परंपरा कायम

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने यंदाही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत विविध धार्मिक आणि सामाजिक घटकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, यावेळी गावातील मुस्लिम समाज बांधवांकडून शिवप्रतिमेचे पूजन मस्जिद जवळ करण्यात आले. ही परंपरा १९८८ पासून सुरु आहे आणि आजतागायत श्रद्धेने पाळली जाते.   मस्जिद जवळ शिवप्रतिमेचे पूजन झाल्यावर मिरवणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. गावातील मुस्लिम समाजाने शिवप्रतिमेचे पूजन करून एकतेचा संदेश दिला, ज्यामुळे धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले. या घटनेने गावातील सौहार्दपूर्ण वातावरण आणखीनच दृढ झाले आहे. शिवजयंती निमित्त ७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान   घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाची...

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव: अमुची शान, अमुचा अभिमान बैलगाडीवरही भगवा

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांनी कधीही आपली मान झुकवली नाही अशा श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात शिवजयंतीचे अनोखे महत्त्व आहे. गावोगावी उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये सर्वत्र भगव्या ध्वजांचे दर्शन होते. हे भगवे ध्वज केवळ उत्सवाचेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि आत्मसन्मानाचे प्रतीक म्हणून उंचावतात.   यंदाच्या शिवजयंतीतही गावागावात आणि शहरांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. लोकांच्या अंगात शिवरायांचा अभिमान आणि त्यांच्या पराक्रमाची आठवण प्रत्येक कार्यक्रमातून जाणवत होती. गावात सणाचे वातावरण असताना, ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाड्यांवरही भगवा ध्वज उंच फडकताना पाहायला मिळाला, ज्यामुळे त्यांच्या स्वराज्याच्या प्रेमाची आणि शिवरायांच्या प्रतिमेवरील श्रद्धेची साक्ष मिळाली.   घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे असाच एक प्रसंग बघायला मिळाला. ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाडीवर भगवा ध्वज अभिमानाने फडकत होता. ही दृश्यं छत्रपती ...

पुन्हा एका मल्टिस्टेट ने केली फसवणूक; पोलिसात गुन्हा दाखल

Image
सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व सचिवांसह संपूर्ण संचालकावर गुन्हा दाखल.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    महाराष्ट्रात काही मल्टिस्टेट पतसंस्था जास्त व्याजदराचे आमिष दाखवून लाखो रुपयांची ठेवी घेतात मात्र त्या परत देण्यासाठी चालढकल करतात असेच दिसून येत. गेल्या कित्येक महिन्यापासून गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या कोट्यावधी रुपयाचे घोटाळा प्रकरण गाजत असतानाच आता पुन्हा एका मल्टिस्टेट ने फसवणूक केल्याचे घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.   स्नेहश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अंबड शाखेच्या व्यवस्थापक, संचालक मंडळाचे प्रमुख अधिकारी आणि इतर पदाधिकारी यांनी मोठ्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेले लाखो रुपये वेळेवर परत न केल्यामुळे नुकसान झाले आहे.असे तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणाची सविस्तर माहिती   लक्ष्मण ठकाजी मंडलिक, 60 वर्षे, व्यवसाय शेती, रा. भायगव्हाण, ता. घनसावंगी, जि. जालना, यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या फिर्यादीनुसार, स्नेहश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्...

जालना वाळूमाफियांविरुद्ध धडाकेबाज कारवाई; अडीच कोटीचा मुद्देमाल जप्त

Image
आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांची मध्यरात्री वेशांतर करून वाळूमाफियांविरुद्ध कारवाई अडीच कोटीचा मुद्देमाल जप्त  दुधना पात्रातून अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या पाच हायवासह दोन जेसीबी पकडले; सुमारे 2.5 कोटींचा मुद्देमाल जप्त वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव शिवारातून जाणाऱ्या दुधना नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करत असलेल्या वाळू तस्करांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. ही कारवाई मध्यरात्री वेशांतर करून हायवामधून नदीपात्रात पोहोचून करण्यात आली.   माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांना दुधना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी वेशांतर करून आणि साध्या गणवेशातील पोलीस कर्मचारी घेऊन कारवाईची योजना आखली.   मध्यरात्री एका वाळू तस्करी करणाऱ्या हायवा वाहनातून स्वतः आयपीएस बारवाल नदीपात्र गाठले. यावेळी वाळू उपसा करणाऱ्या तस्करांना पोलिसांची साधी श...

शेत शिवार - ऊसाचे पाचट पेटून देऊ नका सेंद्रिय खतनिर्मिती करा

Image
घनसावंगी शेतकऱ्यांचा सेंद्रिय खत निर्मितीकडे कल,; सेंद्रिय खत निर्मितीसाठी ऊस पाचटाचा वापर वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण   घनसावंगी तालुक्यात आता शेतकऱ्यांचा सेंद्रिय खत निर्मितीकडे कल वाढला असून सेंद्रिय खत निर्मितीसाठी ऊस पाचटाचा वापर: शेतकरी करतांना दिसून येतात म्हणून ऊस तुटून गेल्यानंतर ऊसाचे पाचट पेटून देऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे.   शेतकऱ्यांसाठी उसाचे पाचट हे केवळ कचरा नसून एक महत्त्वाचा संसाधन आहे. ऊस तुटल्यानंतर मिळणारे पाचट योग्यरित्या वापरले गेले तर त्यातून शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खतनिर्मितीची सुवर्णसंधी उभी राहू शकते. एका एकरात ऊस पिकाच्या कापणीनंतर सुमारे ५ ते ६ टन पाचट उपलब्ध होते, ज्यातून २ ते ३ टन उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार करता येते. यामधून जमिनीत नत्र, स्फुरद आणि पालाश यांसारखी महत्त्वाची अन्नद्रव्ये प्रदान केली जातात, ज्यामुळे जमीन सुपीक होते. पाचट जाळण्याऐवजी व्यवस्थापनाची आवश्यकता  अनेक शेतकरी ऊस तुटल्यानंतर शेतातील पाचट जाळण्याचा सर्रास वापर करतात, पण ही पद्धत मातीसाठी घातक ठरते. पाचट जाळल्यास जमिनीत असलेले सेंद्रिय घटक नष्ट होतात आणि नत्र, स्फु...

शॉर्ट सर्किटमुळे चाळीस एकर ऊस जाळून खाक

Image
विजेच्या तारा स्पर्श होऊन लागलेल्या आगीत 40 ते 45 एकर ऊस जळून खाक; हनुमंतखेडा येथे मोठे नुकसान   जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथे काल रविवारी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 40 ते 45 एकर ऊस जळून खाक झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या आगीत सुमारे पन्नास एकरातील ऊसाचे मोठे नुकसान झाले असून, 10 ते 12 शेतकऱ्यांना या आगीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे एक वर्षाच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे, ज्यामुळे त्या सर्वांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.   घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, विजेच्या तारा एकमेकांना स्पर्श झाल्याने अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे विजेच्या तारा खालच्या उसाच्या शेतात पडल्याने काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. त्या आगीमध्ये ऊसाचे क्षेत्र ताबडतोब जळून खाक झाले. या आगीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाची मदत   आगीची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे लक्षात घेता, घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या गाड्या पाठविण्यात आल्या. तथापि, आ...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या