अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

शॉर्ट सर्किटमुळे चाळीस एकर ऊस जाळून खाक

विजेच्या तारा स्पर्श होऊन लागलेल्या आगीत 40 ते 45 एकर ऊस जळून खाक; हनुमंतखेडा येथे मोठे नुकसान


  जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथे काल रविवारी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 40 ते 45 एकर ऊस जळून खाक झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या आगीत सुमारे पन्नास एकरातील ऊसाचे मोठे नुकसान झाले असून, 10 ते 12 शेतकऱ्यांना या आगीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे एक वर्षाच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे, ज्यामुळे त्या सर्वांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, विजेच्या तारा एकमेकांना स्पर्श झाल्याने अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे विजेच्या तारा खालच्या उसाच्या शेतात पडल्याने काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. त्या आगीमध्ये ऊसाचे क्षेत्र ताबडतोब जळून खाक झाले. या आगीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.


स्थानिक प्रशासनाची मदत

  आगीची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे लक्षात घेता, घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या गाड्या पाठविण्यात आल्या. तथापि, आगीचा प्रचंड वेग असल्याने तोपर्यंत जवळपास 40 ते 45 एकरातील ऊस पूर्णपणे जळून गेला होता.

  शेतकऱ्यांच्या कष्टांचे मोठे नुकसान झाल्याने या सर्व शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने या शेतकऱ्यांची अडचण पाहता, योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.


Comments

Popular posts from this blog