घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव शिवारातून जाणाऱ्या दुधना नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करत असलेल्या वाळू तस्करांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. ही कारवाई मध्यरात्री वेशांतर करून हायवामधून नदीपात्रात पोहोचून करण्यात आली.
माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांना दुधना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी वेशांतर करून आणि साध्या गणवेशातील पोलीस कर्मचारी घेऊन कारवाईची योजना आखली.
मध्यरात्री एका वाळू तस्करी करणाऱ्या हायवा वाहनातून स्वतः आयपीएस बारवाल नदीपात्र गाठले. यावेळी वाळू उपसा करणाऱ्या तस्करांना पोलिसांची साधी शंका येऊ नये यासाठी ही मोहीम अत्यंत गुप्तपणे राबविण्यात आली. आयपीएस बारवाल हायवातून उतरताच त्यांच्या सोबतच्या पोलिसांनी वाळू उपसा करणाऱ्या हायवा आणि जेसीबी वाहनांना घेराव घालून ताब्यात घेतले.
या कारवाईत एकूण पाच हायवा आणि दोन जेसीबी वाहने पकडण्यात आली आहेत. पकडलेल्या वाहनांच्या मदतीने केलेल्या तस्करीचे मूल्य सुमारे 2 कोटी 35 लाख रुपयांचे असल्याचे समजते. यावेळी पाच वाळूतस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी रोखण्यात आली आहे.
ही धडाकेबाज मोहीम मध्यरात्री 1 वाजता सुरू होऊन सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती. या मोहिमेत आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. ठुबे, भगवान नरोडे, हवालदार विष्णू चव्हाण, दीपक पाटील आणि श्री. तायडे आदी पोलीस कर्मचारी आणि फौजफाटा सहभागी झाला होता.
वाळू तस्करीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केलेली ही धाडसी कारवाई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे एक उत्तम उदाहरण ठरली आहे.
दरम्यान इतर काही पोलिस विभाग व महसूल विभागाने असा आदर्श घेणे गरजेचे असून आपली पद, खुर्ची नुसती दाखवण्यासाठी नाही तर अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी आहे. मात्र काही ठिकाणी पाणी मुरत असल्यामुळे याचा विसर काही अधिकाऱ्यांना पडतो की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Comments
Post a Comment