घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

शेत शिवार - ऊसाचे पाचट पेटून देऊ नका सेंद्रिय खतनिर्मिती करा


घनसावंगी शेतकऱ्यांचा सेंद्रिय खत निर्मितीकडे कल,; सेंद्रिय खत निर्मितीसाठी ऊस पाचटाचा वापर



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण

  घनसावंगी तालुक्यात आता शेतकऱ्यांचा सेंद्रिय खत निर्मितीकडे कल वाढला असून सेंद्रिय खत निर्मितीसाठी ऊस पाचटाचा वापर: शेतकरी करतांना दिसून येतात म्हणून ऊस तुटून गेल्यानंतर ऊसाचे पाचट पेटून देऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे.


  शेतकऱ्यांसाठी उसाचे पाचट हे केवळ कचरा नसून एक महत्त्वाचा संसाधन आहे. ऊस तुटल्यानंतर मिळणारे पाचट योग्यरित्या वापरले गेले तर त्यातून शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खतनिर्मितीची सुवर्णसंधी उभी राहू शकते. एका एकरात ऊस पिकाच्या कापणीनंतर सुमारे ५ ते ६ टन पाचट उपलब्ध होते, ज्यातून २ ते ३ टन उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार करता येते. यामधून जमिनीत नत्र, स्फुरद आणि पालाश यांसारखी महत्त्वाची अन्नद्रव्ये प्रदान केली जातात, ज्यामुळे जमीन सुपीक होते.


पाचट जाळण्याऐवजी व्यवस्थापनाची आवश्यकता


 अनेक शेतकरी ऊस तुटल्यानंतर शेतातील पाचट जाळण्याचा सर्रास वापर करतात, पण ही पद्धत मातीसाठी घातक ठरते. पाचट जाळल्यास जमिनीत असलेले सेंद्रिय घटक नष्ट होतात आणि नत्र, स्फुरद यासारख्या अन्नद्रव्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे पाचट व्यवस्थापनाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी न जळणारी पद्धती वापरून फायदा करून घ्यावा. शेतातच पाचट कुजविण्याची पद्धत शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.


पाचट व्यवस्थापन आणि सेंद्रिय खतनिर्मितीची पद्धत


  ऊस तोडणीनंतर शेतात पाचट सरीआड पसरवले जाते. त्यावर युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक मिसळून पाचट कुजवले जाते. यामुळे पाचट लवकर कुजते आणि त्यातून सेंद्रिय घटक जमिनीत मिसळून सुपीकता वाढते. पाचट व्यवस्थापनाची योग्य पद्धत वापरल्यास शेतातील तणांचे नियंत्रण होते, जमिनीतील ओलावा टिकतो आणि जमिनीतल्या गांडुळांची संख्या वाढते, ज्यामुळे मातीच्या पोताचा सुधार होतो.



खोडवा उसामधील पाचट व्यवस्थापनाचे फायदे


 खोडवा उसामध्ये पाचट सरीआड ठेवले जाते. पाचटाच्या कुजविल्यामुळे जमीन भुसभुशीत होते, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि जमिनीचे तापमान ३ ते ५ अंशाने कमी होते. या पद्धतीमुळे पुढील पिकास १० ते १२ टक्क्यांपर्यंत उत्पन्नवाढ होते.


शेतकऱ्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन


 घनसावंगी तालुक्यातील बानेगाव शेतकरी तुकाराम उढाण आणि कैलास उढाण यांनी या सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यांनी ऊस पाचट कुजविण्याच्या पद्धतीचा उपयोग करून त्यांच्या शेतजमिनीची सुपीकता वाढवली आहे, तसेच उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे.


शेतकऱ्यांना आवाहन


 शेतकऱ्यांनी ऊस पाचटाचे योग्य व्यवस्थापन करून सेंद्रिय खतनिर्मितीला प्राधान्य द्यावे. पाचटाचा वापर करून सेंद्रिय खतनिर्मिती केल्याने खर्चात बचत होते, जमिनीची सुपीकता सुधारते आणि तण नियंत्रण होते. त्यामुळे ऊस पाचट जाळण्याऐवजी त्याचा शास्त्रशुद्ध वापर करून सेंद्रिय खतनिर्मितीकडे शेतकऱ्यांनी पाऊल उचलावे,असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या