अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

पुन्हा एका मल्टिस्टेट ने केली फसवणूक; पोलिसात गुन्हा दाखल

सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व सचिवांसह संपूर्ण संचालकावर गुन्हा दाखल..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  महाराष्ट्रात काही मल्टिस्टेट पतसंस्था जास्त व्याजदराचे आमिष दाखवून लाखो रुपयांची ठेवी घेतात मात्र त्या परत देण्यासाठी चालढकल करतात असेच दिसून येत. गेल्या कित्येक महिन्यापासून गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या कोट्यावधी रुपयाचे घोटाळा प्रकरण गाजत असतानाच आता पुन्हा एका मल्टिस्टेट ने फसवणूक केल्याचे घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


  स्नेहश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अंबड शाखेच्या व्यवस्थापक, संचालक मंडळाचे प्रमुख अधिकारी आणि इतर पदाधिकारी यांनी मोठ्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेले लाखो रुपये वेळेवर परत न केल्यामुळे नुकसान झाले आहे.असे तक्रारीत म्हटले आहे.



प्रकरणाची सविस्तर माहिती


  लक्ष्मण ठकाजी मंडलिक, 60 वर्षे, व्यवसाय शेती, रा. भायगव्हाण, ता. घनसावंगी, जि. जालना, यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या फिर्यादीनुसार, स्नेहश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अंबड शाखेमध्ये त्यांनी 15,00,000 रुपये फिक्स डिपॉझिट स्वरूपात जमा केले होते. परंतु, मुदत संपल्यानंतरही बँकेने या रकमेची परतफेड टाळत उडवा-उडवीची उत्तरं दिली.



फिक्स डिपॉझिटची रक्कम आणि त्यासंबंधित दस्तावेज


  मंडलिक यांनी त्यांच्या भूसंपादन मावेजाचे पैसे फिक्स डिपॉझिट म्हणून सोसायटीच्या खात्यात जमा केले होते. त्यांनी वेळोवेळी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली होती, ज्यात 2 लाख रुपये, 1 लाख रुपये, 50 हजार रुपये असे विविध रक्कमेचे फिक्स डिपॉझिट केले होते. एकूण 15,00,000 रुपयांची फिक्स डिपॉझिट त्यांनी स्नेहश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हमध्ये केली होती.



फसवणुकीची पद्धत


  मंडलिक यांनी सांगितले की, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जास्त व्याज दराचे आमिष दाखवून गुंतवणुकीस प्रवृत्त केले. परंतु, मुदत संपल्यानंतरही पैसे परत मिळाले नाहीत. सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सचिवांसह संपूर्ण संचालक मंडळाने कट रचून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


धनादेशांचे फसवणूक प्रकरण


  सोसायटीने परतफेडीच्या नावाखाली मंडलिक यांना तीन वेगवेगळ्या धनादेशांची रक्कम दिली. परंतु, बँकेत धनादेश वटवण्यासाठी गेल्यावर खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे कारण देत धनादेश वटत नव्हते. हे धनादेश प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेत टाकले असता ते वटले नाहीत, ज्यामुळे आर्थिक फसवणुकीची मोठी घटना समोर आली आहे.


आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल


 मंडलिक यांनी या प्रकरणी चेअरमन शरद बाबुराव खोजे,  व्हाईस चेअरमन, सचिव अंबड, जालना व स्नेहश्री मल्टीस्टेट कोऑप लि, सोसायटीच्या प्रमुख अधिकारीवर्गा विरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

Comments

Popular posts from this blog