घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव: अमुची शान, अमुचा अभिमान बैलगाडीवरही भगवा

 



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांनी कधीही आपली मान झुकवली नाही अशा श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात शिवजयंतीचे अनोखे महत्त्व आहे. गावोगावी उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये सर्वत्र भगव्या ध्वजांचे दर्शन होते. हे भगवे ध्वज केवळ उत्सवाचेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि आत्मसन्मानाचे प्रतीक म्हणून उंचावतात.


  यंदाच्या शिवजयंतीतही गावागावात आणि शहरांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. लोकांच्या अंगात शिवरायांचा अभिमान आणि त्यांच्या पराक्रमाची आठवण प्रत्येक कार्यक्रमातून जाणवत होती. गावात सणाचे वातावरण असताना, ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाड्यांवरही भगवा ध्वज उंच फडकताना पाहायला मिळाला, ज्यामुळे त्यांच्या स्वराज्याच्या प्रेमाची आणि शिवरायांच्या प्रतिमेवरील श्रद्धेची साक्ष मिळाली.


  घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे असाच एक प्रसंग बघायला मिळाला. ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाडीवर भगवा ध्वज अभिमानाने फडकत होता. ही दृश्यं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि त्यांच्याप्रती असलेल्या आदराचे प्रतीक होती. हे छायाचित्र संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्यास महत्त्वपूर्ण ठरले आहे.


  भगवा ध्वज आजही महाराजांच्या विचारांचे, स्वराज्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा सर्वसामान्य जनतेसाठी एक दीपस्तंभ आहे, आणि त्यांची जयंती हा त्या गौरवशाली इतिहासाचा साक्षात्कार आहे.

Comments

  1. शिवप्रेमींच अभिनंदन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या