Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

कंपनीत मकाखाली दबून चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Image
  छत्रपती संभाजीनगरात  कंपनीत मकाखाली दबून चार  कामगारांचा दुर्दैवी मृत्यू  रुग्णवाहिका, अग्निशामक दल, १० जेसीबी, ४ पोकलेन  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    छत्रपती संभाजीनगरातील शेंद्रा एमआयडीसीतील रॅडिको कंपनीत टाकी फुटून ४ मजुरांचा साठवलेल्या मका खाली दबल्याने गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज १५ नोव्हेंबर रोजी घडलीय.घटनास्थळी १२ रुग्णवाहिका, अग्निशामक दल, १० जेसीबी, ४ पोकलेन काम करत आहेत.    ही घटना शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीतील रॅडिको कंपनीत आज १५ नोव्हेंबरला दुपारी दोनच्या सुमारास मद्यनिर्मितीसाठी आवश्यक मका साठवलेली टाकी अचानक फुटली. यात मकाखाली दबून चार कामगारांचा मृत्यू झालाय. मकाखाली आणखीही काही मजूर दबून अत्यवस्थ झालेत अशी माहिती मिळतेय.    दत्तात्रेय लक्ष्मण बोदरे (वय ३५) रा. कुंभेफळ, किसन सर्जेराव हिरडे (वय ४५) रा. गोपाळपूर, विजय भीमराव गवळी (वय ४५) रा. अशोकनगर व संतोष भास्कर पोपळघट (वय ३५) रा. भालगाव अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दुर्घटनेला व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप करत सकल मराठा समाजानतील काहींनी क...

ब्ल्यू सफायर ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार - ऊसाच्या दबावाला बळी पडू नका डॉ. हिकमतदादा उढाण

Image
    ब्ल्यू सफायर ९ लाख मेट्रिक  टन ऊस  गाळप करणार -  ऊसाच्या दबावाला बळी  पडू नका डॉ. हिकमतदादा  उढाण   "पुढील वर्षी ब्ल्यू सफायर चे दोन्हीं युनिट मिळून तब्बल ९ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार असून, आता कुणीही कोणत्याही प्रकारच्या व ऊसाच्या दबावाला बळी पडू नका," असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ. हिकमतदादा उढाण यांनी १५ ओन्हेंबर रोजी राणी  उंचेगाव सर्कल मधील मानेपुरी, मुढेगाव, दैठणा, सावरगाव, आंतरवाली-राठी, तळेगाव, चापडगाव, आंतरवाली दाई येथील प्रचार दौरा प्रसंगी केले.     उढाण यांनी स्पष्ट केले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून योग्य तो भाव देण्यास कटिबद्ध आहोत. "शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतपणे कारखान्याच्या निर्णयांवर विश्वास ठेवावा," असे आवाहन त्यांनी केले. “आम्ही शेतकऱ्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन करू आणि त्यांना हक्काचा नफा मिळवून देऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले.    शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम राबवण्याचा विचार कारखाना क...

पोलीस हवालदाराचा रेल्वेतून पडून मृत्यू !

Image
  पोलीस हवालदाराचा रेल्वेतून  पडून मृत्यू !     जालन्यातील पोलीस हवालदार लोखंडे यांचा कल्याण येथे रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज १५ नोव्हेंबर रोजी घडलीय.      जालना येथील एसआरपीएफ ग्रुप तीनमधून वर्षभरापूर्वी ठाणे पोलीस दलात बदलून गेलेले पोलीस हवालदार दत्ता उत्तमरावं लोखंडे (वय ४१) यांचा डेक्कन मेल मुंबई-पुणे प्रवास करीत असताना कल्याण रेल्वे स्थानकात आज सकाळी पडून मृत्यू झाला आहे.  डेक्कन मेल ही कल्याण स्थानकात थांबत नाही मात्र या गाडीचा वेग कमी होताच त्यांनी तेथे उतरण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडली आहे. लोखंडे यांचे कुटुंब जालना येथेच स्थायिक आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

डॉ हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; प्रचाराला नवा आयाम

Image
  डॉ हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी  महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; प्रचाराला  नवा आयाम वास्तव न्युज – ओमप्रकाश उढाण      घनसावंगी मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाळीत हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. गावागावात महिला मतदार हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी पुढे येत आहेत महिलांच्या या सहकार्यामुळे प्रचाराला नवा आयाम मिळाला आहे. आणि त्यांनी आपल्या प्रचार मोहिमेत नवी ऊर्जा भरली आहे.    महिला प्रचारक सकाळपासून गावांमध्ये घराघरात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण योजना व हिकमत उढाण यांच्या मनमिळाऊ स्वभाव, प्रामाणिकपणा आदीसह कामगिरीची माहिती देत आहेत. उढाण यांनी महिलांच्या विकासासाठी केलेल्या योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांनी प्रचारात पुढाकार घेतला आहे. मतदारसंघातील विविध गावांमध्ये महिलांच्या उत्स्फूर्त प्रचार मोहिमेने वातावरण उत्साहाने भरले आहे.    महिलांच्या या सहकार्यामुळे प्रचाराला नवा आयाम मिळाला आहे. "महिलांच्या सहभागामुळे आमच्या मोहिमेत एक सकारात्मक लहर आली आहे,"  घनसावंगी विधानसभा मतदारसंघ सुजला...

शहागडला १ लाख ८८ हजार तर बदनापूरला १ लाख ७० हजाराची रोकड पकडली

Image
  शहागडला १ लाख ८८ हजार  तर बदनापूरला १ लाख ७०  हजाराची रोकड पकडली   जालना जिल्ह्यातील शहागड व बदनापूर या दोन ठिकाणी एस एस टी पथकाने ३ लाख ५८ हजार रुपयेची रोकड आज पकडलीय. आज अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस स्टेशन हद्दीत एस एस टी पाँईट शहागड येथे नाकबंदी दरम्यान १ लाख ८८ हजाराची रोकड पकडली.    सदरची १ लाख ८८ हजाराची रोकड रक्कम ही टाटा कंपनीची कार क्र एम एच ०१-सीआर १२६ मधील मालक नामे मंदार रावसाहेब वरपे (रा आळेफाटा ता जुन्नर जि पुणे) यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे. एफएसटी पथक यांना बोलवून पुढील कारवाईसाठी रक्कम त्यांच्या ताब्यात गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी दिली आहे.    दुसऱ्या घटनेत  बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरुडी येथे चेक पोस्ट सुरु केलेले आहे, या चेक पोस्ट वर पोलीस कर्मचारी फेरोज खान, पोलिस कर्मचारी कनाके,राजेंद्र बोकन, सी. डी. गायकवाड, जगन्नाथ उगले हे १३ नोव्हेंबर रोजी दुपारी कर्तव्य बजावत असतांना संभाजीनगर कडून एम एच -२० -सी एस या कार ची एस एस टी पथकाने तपासणी केली असता वाहनामध्ये १ लाख ७० हजा...

उमेदवार-कार्यकर्ते गावात शेतकरी राजा वावरात ! मतदार शोधताशोधता नेत्यासह कार्यकर्त्यांची दमछाक

Image
  उमेदवार - कार्यकर्ते गावात  शेतकरी राजा वावरात !  मतदार शोधताशोधता  नेत्यासह कार्यकर्त्यांची  दमछाक    ऊस लागवड, कापूस वेचणी, रब्बीत शेतकरी व्यस्त.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दर पाच वर्षाला अनेक निवडणुका येत असतात आता विधानसभेची निवडणूक येऊ घातलिय. एकीकडे प्रशासकीय स्तरावर निवडणुकांना लोकशाहीचा महोत्सव म्हणून पाहिले जाते तर दुसरीकडे सर्वसामान्य श्रमजीवी, शेतमजूर मतदारराजाला या समारंभाचे काहीएक देणेघेणे नसल्याचे चित्र सध्या तरी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण परिसरात दिसून येत आहे.     कारण उमेदवार व भावी आमदाराचे कार्यकर्ते गावात. फिरताना दिसत आहेत तर शेतकरी आपल्या वर्षभराचा सरमाया जमा करण्यासाठी पहाटेपासून सांजपर्यंत बांधावर राबत आहे. यामुळे प्रचार करणाऱ्या कार्यकत्यांची अडचण झाली आहे. उमेदवारांना आत्ता बांधावर जाऊन प्रचार करण्याची वेळ आली आहे.   बदलत्या राजकीय वातावरणात निवडणुका म्हटल्या की, पंधरा वीस दिवस आलिशान जेवणाची व्यवस्था, फिरण्यासाठी चार चाकी वाहन, पांढरेशुभ्र...

घनसावंगीत डॉ हीकमत उढाण यांचा झंझावात गावोगावी प्रवेशाची मोठी शृंखलाच

Image
  घनसावंगीत हीकमत उढाण  यांचा झंझावात गावोगावी  प्रवेशाची मोठी शृंखलाच   घनसावंगी विधानसभा मतदासंघात डॉ हीकमत उढाण यांचा झंझावात चालु असून गावा गावातील कार्यकर्त्यांची प्रवेशाची मोठी शृंखलाच (फळी) प्रवेश करत असताना दिसून येते. जनतेला मूलभूत समस्या सोडवण्यासाठी निष्फळ ठरलेल्या व फक्त आश्वासने देणाऱ्यांना घरी पाठवा व यावेळी बदल घडावा असे आवाहन मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ हीकमत उढाण यांनी केले.   घनसावंगी मतदारसंघातील कुक्कडगाव, सुखापुरी, लखमापूरी, करणंजळा, मठतांडा, शहापूर गाठी भेटी दौरा व विवीध ग्रामस्थांच्या समस्या ग्रामस्थानी हीकमत उढाण यांच्या कडे मांडल्या.  यावेळी उढाण यांनी मतदार संघात गेल्या कित्तेक वर्षापासून सर्व सामान्य जनता एकीकडे मूलभूत समस्या नी त्रस्त असून दुसरीकडे विकासाच्या गप्पा मारण्यात येतात म्हणून मतदासंघातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी निष्फळ ठरणाऱ्या घरी पाठवा; बदल घडावा यासाठी धनुष्य बाणाला मतदान करा असे आवाहन हिकमतदादा उढाण यांनी आपल्या प्रचार दौऱ्याप्रसंगी केले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. अनेकांच...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या