अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

कंपनीत मकाखाली दबून चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

 छत्रपती संभाजीनगरात

 कंपनीत मकाखाली दबून चार

 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू 

रुग्णवाहिका, अग्निशामक दल, १० जेसीबी, ४ पोकलेन 

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

 छत्रपती संभाजीनगरातील शेंद्रा एमआयडीसीतील रॅडिको कंपनीत टाकी फुटून ४ मजुरांचा साठवलेल्या मका खाली दबल्याने गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज १५ नोव्हेंबर रोजी घडलीय.घटनास्थळी १२ रुग्णवाहिका, अग्निशामक दल, १० जेसीबी, ४ पोकलेन काम करत आहेत.

   ही घटना शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीतील रॅडिको कंपनीत आज १५ नोव्हेंबरला दुपारी दोनच्या सुमारास मद्यनिर्मितीसाठी आवश्यक मका साठवलेली टाकी अचानक फुटली. यात मकाखाली दबून चार कामगारांचा मृत्यू झालाय. मकाखाली आणखीही काही मजूर दबून अत्यवस्थ झालेत अशी माहिती मिळतेय. 

  दत्तात्रेय लक्ष्मण बोदरे (वय ३५) रा. कुंभेफळ, किसन सर्जेराव हिरडे (वय ४५) रा. गोपाळपूर, विजय भीमराव गवळी (वय ४५) रा. अशोकनगर व संतोष भास्कर पोपळघट (वय ३५) रा. भालगाव अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

दुर्घटनेला व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप करत सकल मराठा समाजानतील काहींनी कंपनीत रात्री तोडफोड केलीय व कंपनीला कुलूप ठोकले. मृतकांच्या नातेवाईकांना न्याय मिळेपर्यंत कुलूप उघडणार नाही असा पवित्रा घेतला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.

  रॅडिको कंपनी मद्यनिर्मिती करते. मद्यनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात मका साठवून ठेवला होता. ट्रकने आणलेली मका शेडमध्ये प्रत्येकी ३ हजार मेट्रिक टनाच्या दोन टाक्यांत साठवली जाते. या टाक्या लोखंड आणि ऑल्युमिनियमच्या असून, त्यातील एका टाकीला लिकेज होते, असे सूत्रांकडून समजले. तिला कपडा लावून ठेवत दुरुस्तीचे काम शुक्रवारी करण्यात येत होते. ४ मजूर शेडमध्ये टाकीजवळ तर १२ जण आजूबाजूला काम करत होते. दुपारी दोनला दुरुस्ती सुरू असलेली टाकी अचानक फुटून मका चौघांच्या अंगावर कोसळला व याखाली दबून जागीच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत शेडही कोसळले. मका घेऊनही आलेला ट्रकही शेडजवळच उभा होता. ट्रकमधून मका खाली करणारे मजूरही दबले होते पण त्यांच्या मदतीला वेळीच धावून अन्य मजुरांनी त्यांच्यासह ट्रकचालकाला वाचवले.

  या अपघातानंतर मृतकांच्या नातेवाइकांनी कंपनीत ठिय्या आंदोलन सुरू केले पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी कंपनीत येऊन पाहणी केली. यासाठी रुग्णवाहिका, अग्निशामक दल, १० जेसीबी, ४ पोकलेन काम करत होते.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या