घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज – ओमप्रकाश उढाण
घनसावंगी मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाळीत हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. गावागावात महिला मतदार हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी पुढे येत आहेत महिलांच्या या सहकार्यामुळे प्रचाराला नवा आयाम मिळाला आहे. आणि त्यांनी आपल्या प्रचार मोहिमेत नवी ऊर्जा भरली आहे.
महिला प्रचारक सकाळपासून गावांमध्ये घराघरात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण योजना व हिकमत उढाण यांच्या मनमिळाऊ स्वभाव, प्रामाणिकपणा आदीसह कामगिरीची माहिती देत आहेत. उढाण यांनी महिलांच्या विकासासाठी केलेल्या योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांनी प्रचारात पुढाकार घेतला आहे. मतदारसंघातील विविध गावांमध्ये महिलांच्या उत्स्फूर्त प्रचार मोहिमेने वातावरण उत्साहाने भरले आहे.
महिलांच्या या सहकार्यामुळे प्रचाराला नवा आयाम मिळाला आहे. "महिलांच्या सहभागामुळे आमच्या मोहिमेत एक सकारात्मक लहर आली आहे,"
कित्तेक वर्षापासून मतदारसंघात सर्वसामान्य जनता विविध समस्यांनी ग्रासली असून घनसावंगी विधानसभा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी एकदा संधी द्या त्या संधीचे नक्कीच सोने केल्याशिवाय रहाणार नाही अशा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉ हिकमतदादा उढाण यांनी १४ नोव्हेंबर रोजी व्यक्त केला.
![]() |
महायुतीचे अधिकृत उमेदवार हिकमत बळीराम उढाण यांचा आंतरवाली टेंभी व तीर्थपुरी सर्कल मधील राजाटाकळी, शिवनगाव, भादली, नागोबाची वाडी, बोडखा, गुंज बु, मांदळा, नाथनगर, राजूरकर कोठा दैठणा खु, उक्कडगाव, सिरसवाडी, जोगलादेवी, रामसगाव, शेवता आदी गावात १४ नोव्हेंबर रोजी प्रचार दौरा झाला. याप्रसंगी हिकमत उढाण यांचे ठिकठिकाणच्या ग्रामस्थानी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
Comments
Post a Comment