घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

उमेदवार-कार्यकर्ते गावात शेतकरी राजा वावरात ! मतदार शोधताशोधता नेत्यासह कार्यकर्त्यांची दमछाक

 उमेदवार - कार्यकर्ते गावात
 शेतकरी राजा वावरात !

 मतदार शोधताशोधता
 नेत्यासह कार्यकर्त्यांची
 दमछाक 

 ऊस लागवड, कापूस वेचणी, रब्बीत शेतकरी व्यस्त..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दर पाच वर्षाला अनेक निवडणुका येत असतात आता विधानसभेची निवडणूक येऊ घातलिय. एकीकडे प्रशासकीय स्तरावर निवडणुकांना लोकशाहीचा महोत्सव म्हणून पाहिले जाते तर दुसरीकडे सर्वसामान्य श्रमजीवी, शेतमजूर मतदारराजाला या समारंभाचे काहीएक देणेघेणे नसल्याचे चित्र सध्या तरी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण परिसरात दिसून येत आहे. 

  कारण उमेदवार व भावी आमदाराचे कार्यकर्ते गावात. फिरताना दिसत आहेत तर शेतकरी आपल्या वर्षभराचा सरमाया जमा करण्यासाठी पहाटेपासून सांजपर्यंत बांधावर राबत आहे. यामुळे प्रचार करणाऱ्या कार्यकत्यांची अडचण झाली आहे. उमेदवारांना आत्ता बांधावर जाऊन प्रचार करण्याची वेळ आली आहे.

  बदलत्या राजकीय वातावरणात निवडणुका म्हटल्या की, पंधरा वीस दिवस आलिशान जेवणाची व्यवस्था, फिरण्यासाठी चार चाकी वाहन, पांढरेशुभ्र कपडे, ज्या परिसरात आपण प्रचारासाठी जात आहोत तो संपूर्ण परिसर आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास अशा ऐटीत मिरवून उमेदवार व कार्यकर्ते प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. परंतु गंमत अशी की सध्या शेतशिवार कापसाने पांढरे झाले ओ. कापूस वेचणीस मजूर दिसत नसल्याने अल्पभूधारक शेतकऱ्या पासून जमीनदारापर्यंत सर्वच शेतकरी कापूस वेचणीच्या कामाला भिडले आहेत.

    गावानुसार आराखडा ठरवून प्रचाराची आखणी केलेल्या उमेदवार कार्यकत्यांना गावात कुणीच गवसत नसल्याने हाताश होऊन परतावं लागतंय काही कार्यकर्ते मात्र शेतात जाऊन शेतकरी राजाला भेटून प्रचार करत आहेत. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात तरी निवडणुकीची धामधूम पाहिजे तेवढी दिसायला तयार नाही. खऱ्या अर्थाने कोणता उमेदवार बाजी मारणार, मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने असेल हेही कळत नसल्याने कार्यकत्यांमध्ये बेचैनी तर उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी उमेदवार शेतकऱ्यांच्य बांधावर अशी म्हणण्याची वेळ सध्या तरी आली आहे.

 गाव पुढाऱ्यांची झाली पंचायत..

  नव्वदच्या दशकात निवडणुका आल्या की गाव पुढाऱ्याचे भाव वाढले जायचे. संपूर्ण गावाच्या मतांचा गठ्ठा आपल्याच तिजोरीत ठेवल्यागत वावर असायचा. परंतु बदलत्या काळानुसार गल्लीबोळात कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. पुढाऱ्यांच्या बैठका पुरातन खाती जमा होऊन नवख्यांचे प्रचारात फाईव्ह जी वर्चस्व स्थापित झाले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराची रसद थेट गावं पुढाऱ्यांच्या हातात पडतं नसल्याने त्यांची मोठी पंचायत झाली आहे. चहा पानाच्या खर्चासाठी त्यांना चातकाप्रमाणे वाट पाहावी लागत असल्याचे चित्र दिसून येते आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या