घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
"पुढील वर्षी ब्ल्यू सफायर चे दोन्हीं युनिट मिळून तब्बल ९ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार असून, आता कुणीही कोणत्याही प्रकारच्या व ऊसाच्या दबावाला बळी पडू नका," असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ. हिकमतदादा उढाण यांनी १५ ओन्हेंबर रोजी राणी उंचेगाव सर्कल मधील मानेपुरी, मुढेगाव, दैठणा, सावरगाव, आंतरवाली-राठी, तळेगाव, चापडगाव, आंतरवाली दाई येथील प्रचार दौरा प्रसंगी केले.
उढाण यांनी स्पष्ट केले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून योग्य तो भाव देण्यास कटिबद्ध आहोत. "शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतपणे कारखान्याच्या निर्णयांवर विश्वास ठेवावा," असे आवाहन त्यांनी केले.
“आम्ही शेतकऱ्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन करू आणि त्यांना हक्काचा नफा मिळवून देऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम राबवण्याचा विचार कारखाना करत आहे. कारखान्याच्या आधुनिकीकरणासह ऊसाच्या अधिक गाळपाची क्षमता निर्माण केली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास गतीने होईल असा विश्वास डॉ. उढाण यांनी व्यक्त केला.
महायुतीचे अधिकृत उमेदवार हिकमत बळीराम उढान यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते पंडित भुतेकर.
जि प उपाध्यक्ष महेंद्र पवार, जि प सदस्य जयमंगल जाधव, शिवसंग्राम चे प्रवक्ते लक्ष्मण नवले व कल्याणीताई गजानन तौर यांनी अनेक गावात भेटी देऊन हिकमत दादा उढान यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले.
Comments
Post a Comment