Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

कित्येक वर्षापासून गायब असलेले नेते सोशल मीडियावर झळकू लागले..!

Image
  कित्येक वर्षापासून गायब असलेले नेते सोशल मीडियावर झळकू लागले..! कार्यकर्त्याकडून विविध पदव्या बहाल... सोशल मीडियावर नेतेमंडळी सह कार्यकर्त्यांचा धुमाकूळ... वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष अपक्ष सह इतर राजकीय संघटना व सामाजिक संघटना यांचे गेल्या कित्येक वर्षापासून गायब असलेले कार्यकर्ते नेते या निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियावर त्यांच्या अनेक पोस्ट वायरल होताना दिसून येत आहेत.     निवडणुकी म्हटलं की कार्यकर्त्यांचं चांगभलं होताना दिसून येत आहे यामुळे प्रत्येक पक्षाच्या तसेच अपक्ष इतर राजकीय व सामाजिक संघटना यांचे कार्यकर्ते आपल्या नेते मंडळींना सोशल मीडियावर मोठमोठ्या पदव्या बहाल करत असून सद्यस्थितीत सोशल मीडियावर या नेतेमंडळींचा धुमाकूळ चालला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यातील अनेक नेतेमंडळी पावसाळ्यातील छत्र्याप्रमाणे निवडणूक ते निवडणूक त्या कालावधीतच जनतेसमोर येत असून दुसरीकडे त्यांचे बगलबच्चे कार्यकर्ते मात्र या नेतेमंडळींना नको त्या पदव्या बहाल करून आमचे नेते कसे चांगले हे पटवून देण्याचा केविलव...

जिल्हाधिकारी यांनी केली घनसावंगी येथील स्ट्राँग रूम आणि मतमोजणी कक्षाची पाहणी..!

Image
  जिल्हाधिकारी यांनी केली घनसावंगी येथील स्ट्राँग रूम आणि मतमोजणी कक्षाची पाहणी..! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी घनसावंगी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने घनसावंगी येथील स्ट्रॉंग रूम मतमोजणी कक्ष सह इतर ठिकाणची पाहणी केली तसेच घनसांगी मतदारसंघातील निवडणूक कामाचा आढावा घेऊन उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना माहिती दिली.  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी १००– घनसावंगी विधानसभा मतदार संघ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजेगाव रोड, घनसावंगी येथे भेट देवून तेथील विधानसभा निवडणूकीचे नियोजन, गृह मतदान, मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण, पोस्टल बॅलेट मतदान नियोजन, स्ट्राँग रूम आणि मतमोजणी कक्षाची पाहणी केली.    तसेच, तहसील कार्यालयातील मतदान प्रक्रियेचा आणि नामनिर्देशन बाबतच्या तयारीचा संपूर्ण आढावा घेतला. त्यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी, शशिकांत हदगल, निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार घनसावंगी योगिता...

घनसावंगी विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत ८३ उमेदवारांकडून १८० नामनिर्देशन पत्र हस्तगत..

Image
  घनसावंगी विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत ८३ उमेदवारांकडून १८० नामनिर्देशन पत्र हस्तगत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी आज दिनांक २५ ऑक्टोबर पर्यंत एकूण ८३ उमेदवाराकडून १८० उमेदवारी अर्ज हस्तगत केले गेले आहेत.   १००-घनसावंगी विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूकीसाठी आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी निसार सुभानखा पठाण – २ नामनिर्देशन पत्र, गजानन रामनाथ उगले - २ नामनिर्देशन पत्र असे एकूण ४ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आजपर्यंत ८ उमेदवारांनी एकूण ११ नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे.   तसेच आज दिनांक २५ रोजी १८ उमेदवार यांनी २८ नामनिर्देशन पत्र हस्तगत केले असून आज तारखेपर्यंत एकूण ८३ उमेदवारांनी १८० नामनिर्देशन पत्र हस्तगत केलेली आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी १०० – घनसावंगी विधानसभा मतदार संघ यांनी दिलीय.

राजेश टोपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

Image
  राजेश टोपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी राजेश टोपे यांनी आपला उमेदवारी अर्ज मा.खा.अमोल कोल्हे, मा.खा.संजय जाधव, मा.खा.डॉ. कल्याण काळे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दाखल केला.    घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आज राजेश टोपे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की तुमचं आणि माझ नात हे जिव्हाळ्याचे आणि आपलेपणाचे असल्याचे तुम्ही आज पुन्हा एकदा अधोरेखित करून माझ्यातला आत्मविश्वास लाख पटीने वाढवलात.     स्वाभिमानाची आणि निष्ठेची लढाई जिंकण्यासाठी ताकतीने मैदानात उतरण्यासाठी तुम्ही सज्ज झालात हे आजच्या गर्दीतून आपण सिद्ध करून दाखवलत.हीच मायेची - प्रेमाची शिदोरी घेऊन तुमच्यासाठी जीव ओतून काम करेल हा शब्द या निमित्ताने देतो.   कोरोना काळात केलेलं कार्य ही माझी जबाबदारी होती.ही जबाबदारी तुमच्या विश्वासाच्या जोरावर मला पूर्ण करता आली. पुढे देखील जनतेचा सेवक म्हणून जबाबदारी प...

जालना जिल्ह्यात आजपर्यंत ३१२ उमेदवारांना ७५० नामनिर्देशन अर्जाचे वितरण

Image
  जालना जिल्ह्यात आजपर्यंत ३१२ उमेदवारांना ७५० नामनिर्देशन अर्जाचे वितरण जालना जिल्ह्यात विधानसभा मतदार संघासाठी आज २० उमेदवारांचे २६ अर्ज दाखल     वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण          जालना जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ९९- परतूर, १००-घनसावंगी, १०१ -जालना, १०२- बदनापूर (अ.जा.) आणि १०८-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज २० ऑक्टोबर उमेदवारांनी २६ नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकुण २५ उमेदवारांचे ३२ नामनिर्देशन अर्ज स्विकारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.      ९९-परतूर विधानसभा मतदार संघासाठी ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात आसाराम जिजाभाऊ बोराडे (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), सुरेशकुमार कन्हैलाल जेथलिया (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांचा समावेश आहे. १००-घनसावंगी मतदारसंघासाठी ३ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात राजेश अंकुशराव टोपे (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार...

घनसावंगी आज चार नामनिर्देशन पत्र दाखल

Image
  घनसावंगी आज चार नामनिर्देशन पत्र दाखल १००-घनसावंगी विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूकीसाठी आज दिनांक २४ ऑक्टोबर रोजी चार नामनिर्देशन पत्र दाखल  झाले आहेत.  यात राजेश अंकुशराव टोपे - २ नामनिर्देशन पत्र, मनिषाताई राजेशभैय्या टोपे - १ नामनिर्देशन पत्र, रमेश मारोतराव वाघ - १ नामनिर्देशन पत्र असे एकूण ४ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. अशी माहिती नीवडणूक निर्णय अधिकारी, १००– घनसावंगी विधानसभा मतदार संघ यांनी दिलीय.

जालन्यातील चार महिन्यापूर्वी अपहरण झालेला ७ वर्षाचा बालक दिल्लीत सापडला.!

Image
  जालन्यातील चार महिन्यापूर्वी अपहरण झालेला ७ वर्षाचा बालक दिल्लीत सापडला.! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील चार महिन्यापूर्वी पाला'वरून अपहरण झालेला ७ वर्षाचा बालक दिल्लीत सापडला आहे अंबड पोलिसांच्या शर्थीच्या प्रयत्नांना अखेर यश आलेय अंबड पोलिसांचे पथक बालकाला सोबत घेऊन दिल्लीहून जालन्याकडे रवाना झाले आहे   अंबड तालुक्यातील रवना -पराडा दर्ग्याजवळच असलेल्या गोंधळवाडी येथील पारधी वस्तीवरील पालावरून चार महिन्यांपूर्वी जुलै २०२४ मध्ये सोमनाथ वनेश शिंदे हा ७ वर्षाचा मुलगा अचानक गायब झाला होता.सदर मुलाचा नातेवाईकांनी परिसरातील पारधी समाजाच्या वस्त्त्यांसह जिल्ह्यात सर्वत्र शोध घेतला होता, मात्र तो सापडत नव्हता.   याप्रकरणात अंबड पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून, आई-वडिलांपासून पारखे झालेल्या या मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी तपासचक्रे गतीने फिरविली. अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी पोलीस हवालदार विष्णू चव्हाण यांच्यासह एक पथक स्थापन केले संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यात सर्व पोलिसांना या मुलाच्या छाय...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या