घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी आज दिनांक २५ ऑक्टोबर पर्यंत एकूण ८३ उमेदवाराकडून १८० उमेदवारी अर्ज हस्तगत केले गेले आहेत.
१००-घनसावंगी विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूकीसाठी आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी निसार सुभानखा पठाण – २ नामनिर्देशन पत्र, गजानन रामनाथ उगले - २ नामनिर्देशन पत्र असे एकूण ४ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आजपर्यंत ८ उमेदवारांनी एकूण ११ नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे.
तसेच आज दिनांक २५ रोजी १८ उमेदवार यांनी २८ नामनिर्देशन पत्र हस्तगत केले असून आज तारखेपर्यंत एकूण ८३ उमेदवारांनी १८० नामनिर्देशन पत्र हस्तगत केलेली आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी १०० – घनसावंगी विधानसभा मतदार संघ यांनी दिलीय.
Comments
Post a Comment