घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी राजेश टोपे यांनी आपला उमेदवारी अर्ज मा.खा.अमोल कोल्हे, मा.खा.संजय जाधव, मा.खा.डॉ. कल्याण काळे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दाखल केला.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आज राजेश टोपे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की तुमचं आणि माझ नात हे जिव्हाळ्याचे आणि आपलेपणाचे असल्याचे तुम्ही आज पुन्हा एकदा अधोरेखित करून माझ्यातला आत्मविश्वास लाख पटीने वाढवलात.
स्वाभिमानाची आणि निष्ठेची लढाई जिंकण्यासाठी ताकतीने मैदानात उतरण्यासाठी तुम्ही सज्ज झालात हे आजच्या गर्दीतून आपण सिद्ध करून दाखवलत.हीच मायेची - प्रेमाची शिदोरी घेऊन तुमच्यासाठी जीव ओतून काम करेल हा शब्द या निमित्ताने देतो.
कोरोना काळात केलेलं कार्य ही माझी जबाबदारी होती.ही जबाबदारी तुमच्या विश्वासाच्या जोरावर मला पूर्ण करता आली. पुढे देखील जनतेचा सेवक म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण मला संधी द्याल ही खात्री आहे. योजनांचे गाजर दाखवून या जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.तुम्हाला - मला आता विरोधकांना जाब विचारायची हीच ती वेळ आहे. ते फसव्या योजना दाखवतील परंतु तुम्ही शेतीमालाला हमीभाव नाही, युवकांच्या हाताला रोजगार नाही, आपल्या माता - भगिनी सुरक्षित नाहीत हे दाखवून देण्याची हीच ती वेळ आहे. असे शेवटी राजेश टोपे यांनी सांगितले.
या वेळी घनसावंगी ची सत्ता बदल होणार च
ReplyDelete