घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष अपक्ष सह इतर राजकीय संघटना व सामाजिक संघटना यांचे गेल्या कित्येक वर्षापासून गायब असलेले कार्यकर्ते नेते या निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियावर त्यांच्या अनेक पोस्ट वायरल होताना दिसून येत आहेत.
निवडणुकी म्हटलं की कार्यकर्त्यांचं चांगभलं होताना दिसून येत आहे यामुळे प्रत्येक पक्षाच्या तसेच अपक्ष इतर राजकीय व सामाजिक संघटना यांचे कार्यकर्ते आपल्या नेते मंडळींना सोशल मीडियावर मोठमोठ्या पदव्या बहाल करत असून सद्यस्थितीत सोशल मीडियावर या नेतेमंडळींचा धुमाकूळ चालला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यातील अनेक नेतेमंडळी पावसाळ्यातील छत्र्याप्रमाणे निवडणूक ते निवडणूक त्या कालावधीतच जनतेसमोर येत असून दुसरीकडे त्यांचे बगलबच्चे कार्यकर्ते मात्र या नेतेमंडळींना नको त्या पदव्या बहाल करून आमचे नेते कसे चांगले हे पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसून येत आहेत.
काही कार्यकर्त्यांनी आपल्या नेते मंडळीला विकासाचे महामेरू, विकासाची जाण असणारे, विकसभिमुख नेतृत्व अशा विविध पदव्या देऊन गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या नेत्यांनी एवढा सारा विकास केला असा गाजावाजा सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे मात्र जर या नेते मंडळींनी एवढा विकास कामे केली तर त्यांना निवडणुकांमध्ये प्रचार करायची गरजच का भासते असा प्रश्नही दुसरीकडे उपस्थित होत आहे
Comments
Post a Comment