घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी घनसावंगी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने घनसावंगी येथील स्ट्रॉंग रूम मतमोजणी कक्ष सह इतर ठिकाणची पाहणी केली तसेच घनसांगी मतदारसंघातील निवडणूक कामाचा आढावा घेऊन उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना माहिती दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी १००– घनसावंगी विधानसभा मतदार संघ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजेगाव रोड, घनसावंगी येथे भेट देवून तेथील विधानसभा निवडणूकीचे नियोजन, गृह मतदान, मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण, पोस्टल बॅलेट मतदान नियोजन, स्ट्राँग रूम आणि मतमोजणी कक्षाची पाहणी केली.
तसेच, तहसील कार्यालयातील मतदान प्रक्रियेचा आणि नामनिर्देशन बाबतच्या तयारीचा संपूर्ण आढावा घेतला. त्यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी, शशिकांत हदगल, निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार घनसावंगी योगिता खटावकर, आंबडचे तहसिलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार संतोष इथापे, गटविकास अधिकारी समीर जाधव, नायब तहसीलदार मोनाली सोनावणे, नायब तहसीलदार अंबड विवेक उढाण, मुख्याधिकारी धीरज भामरे, विजय पाटील, अधिव्याख्याता, रवि जोशी, गटशिक्षणाधिकारी, घनसावंगी, डॉ.सखाराम पवळ, तालूका कृषी अधिकारी, घनसावंगी, मनिषा पैठणे, दुय्यम निबंधक हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment