अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना जिल्ह्यात आजपर्यंत ३१२ उमेदवारांना ७५० नामनिर्देशन अर्जाचे वितरण

 जालना जिल्ह्यात आजपर्यंत ३१२ उमेदवारांना ७५० नामनिर्देशन अर्जाचे वितरण

जालना जिल्ह्यात विधानसभा मतदार संघासाठी आज २० उमेदवारांचे २६ अर्ज दाखल

 

 वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


        जालना जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ९९- परतूर, १००-घनसावंगी, १०१ -जालना, १०२- बदनापूर (अ.जा.) आणि १०८-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज २० ऑक्टोबर उमेदवारांनी २६ नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकुण २५ उमेदवारांचे ३२ नामनिर्देशन अर्ज स्विकारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.

     ९९-परतूर विधानसभा मतदार संघासाठी ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात आसाराम जिजाभाऊ बोराडे (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), सुरेशकुमार कन्हैलाल जेथलिया (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांचा समावेश आहे. १००-घनसावंगी मतदारसंघासाठी ३ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात राजेश अंकुशराव टोपे (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), मनिषाताई राजेशभैय्या टोपे (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांचा समावेश आहे. १०१-जालना विधानसभा मतदार संघासाठी ४ उमेदवारांनी ५ नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात अर्जुनराव पंडितराव खोतकर (शिवसेना), कैलास किसनराव गोरंट्याल (इंडियन नॅशनल काँग्रेस), संगीता कैलास गोरंट्याल (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांचा समावेश आहे. १०२- बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी ७ उमेदवारांनी ८ नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात चौधरी रुपकुमार नेहरुलाल (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी), कुचे नारायण तिलकचंद (भारतीय जनता पार्टी) यांचा समावेश आहे. १०८-भोकरदन या तीन विधानसभा मतदार संघासाठी २ उमेदवारांनी ५ नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात श्रीरंगराव रंगनाथराव जंजाळ (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांचा समावेश आहे. याप्रमाणे आज एकुण २६ नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

   आजपर्यंत एकूण ३१२इच्छुक उमेदवारांना ७५० नामनिर्देशन अर्जाचे वितरण करण्यात आले आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतले. उमेदवारांना मंगळवार, दि. २९ऑक्टोबर पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते ३ यावेळेत आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. 

    बुधवार, दि. ३० ऑक्टोबर, २०२४ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. ४ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. तर बुधवार, दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीचा निकाल शनिवार दि. २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी जाहिर केला जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या