Posts

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

अतिवृष्टीमुळे खरीपाचे प्रचंड नुकसान होउनही शासन-प्रशासन व विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत एक छद्दामही नाही..!

Image
अतिवृष्टीमुळे खरीपाचे प्रचंड नुकसान होउनही शासन-प्रशासन व विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत एक छद्दामही नाही..! सोयाबीन काढनी आधीही पाण्यात व नंतरही पाण्यातच..अनंत नैसर्गिक संकटानी शेतकरी हतबल  वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण     जालना जिल्ह्यात मागील महिन्यापासून चोहिकडे धुंवाधार पाऊस पडत आहे मध्यंतरी जिल्हाभरातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली यामुळे खरीप पिके पाण्याखाली जाऊन दहा ते बारा दिवस पिके पाण्याखालीच होती यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले मध्यंतरी पावसाने थोडीशी उघड दिली यामुळे शेतकरी आता सोयाबीनची काढणी करू लागलाय परंतु गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे हे काढणी केलेले सोयाबीनही पाण्यातच डूबत असल्याचे दिसून येत आहे यामुळे शेतकऱ्याचे दोन्ही बाजूने नुकसान होऊ लागलेय. विशेष म्हणजे खरीप पिकाचे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे एवढे नुकसान होऊनही अद्याप पर्यंत शासन-प्रशासन व पिक विमा कंपनी कडून नुकसाभरपाईची मिळालेली नाहीये तसेच त्याबाबत काही माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली नाही.   शेतकरी राजाला गेल्या तीन-चार वर्षांपासून आनंत नैसर्गिक संकटाचा...

व्हीजे/एनटी/ओबीसी/एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ होणार.!

Image
व्हीजे/एनटी/ओबीसी/एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना  शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ होणार.! वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण  व्हीजे/एनटी/ओबीसी/एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाकडे क्रीमी लेयर प्रमाणपत्र असेल तर शिक्षण शुल्क (Tuition Fee) व परीक्षा शुल्क (Exam Fee) माफ होणार. त्यासाठी याअगोदर असणारी 8 लाख रुपये उत्पन्नाची अट रद्द करण्यात आलीय तसे परिपत्रक शासनाने काढलेय. विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरिता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करणेबाबत. महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन शुध्दीपत्रक क्रमांक: शिवृत्ती-२०२३/प्र.क्र.१३५/शिक्षण-१ मोती महल, २ रा मजला, १९५, जे. टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२० दिनांक : २० सप्टेंबर, २०२४. संदर्भ १) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र. इबीसी-२०१६/प्र.क्र.२२१/ शिक्षण-१, दिनांक ३१ मार्च, २०१६ २) शासन निर्णय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्रमांका इबीसी-२०१७/ प्र.क्र.२७/ शिक्षण, दिनांक ०१ जानेवारी, २०१८...

देवेंद्रजी उपोषणाचा प्रत्येकाला अधीकार आहे तर मराठा बांधवांना परवानगी का नाही..!

Image
देवेंद्रजी उपोषणाचा प्रत्येकाला अधीकार आहे तर मराठा बांधवांना परवानगी का नाही..! वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण  महाराष्ट्रात जालना जिल्हा विविध आंदोलने, उपोषणे याने ढवळून निघालाय याबरोबरच महाराष्ट्र विविध आंदोलनाने, उपोषणे, रस्ता रोको याने पिंजून निघालाय एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपोषणाचा, आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार आहे असे म्हणतात तर दुसरीकडे त्यांचेच पोलीस प्रशासन मात्र मराठा बांधवांच्या उपोषणाला परवानगी नाकारते यामुळे देवेंद्रजी उपोषणाचा प्रत्येकाला अधिकार आहे तर मराठा बांधवांना परवानगी का नाही असा प्रश्न उपस्थित होतोय.. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मन जरांगे यांनी आंतरवाली सराटीत विविध आंदोलने उपोषणे गेल्या वर्षभरापासून चालू केले आहेत तेथेच काही दिवसापासून अंतरवाली सराटी रोड जवळ वडीगोद्री जवळ ओबीसी बांधवांचेही उपोषण सुरू आहेत त्याला पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळालेली आहे या विविध आंदोलने उपोषणे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना काही पत्रकाराने प्रश्न केला असता प्रत्येकाला उपोषण आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं उपमुख्यमंत्र...

अंबड -घनसावंगी तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून तर दुसऱ्याचा शॉक लागून मृत्यू..!

Image
अंबड -घनसावंगी तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून तर दुसऱ्याचा शॉक लागून मृत्यू..! घनसावंगी तालुक्यात वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर अंबड तालुक्यात वीजेचा शाॅक लागुन शाळकरी मुलाचा मृत्यू..!   वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण  जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला असून घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली दाई येथील शेतकरी अशोक भागुजी गंदाखे हे शेतातून काम करून घरी परत जात असताना अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडलीय. तर दुसरी घटना अंबङ तालूक्यातील हारतखेङा येथील प्रणव भिकाजी ढवळे (वय ११ वर्षे ) याचा हारतखेडा शिवारातील शेतात गेला असता तेथुन एका तारेला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडलीय. अंतरवाली दाई ता. घनसावंगी येथील शेतकरी अशोक भागुजी गंदाखे (वय ४० वर्षे) हे सकाळीच आपल्या शेतात गेले होते शेतातून काम करून दुपारच्या सुमरास घरी वापस येत असताना भरत सिताराम गोटे यांच्या गट नंबर ४१ व ४२ च्या मध्ये त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.    त्यांच्या कुटुंबात आई- वडी...

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

Image
नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री यांचा कार्यक्रम उधळला..! वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण  नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांचा जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील दि २३ सप्टेंबर सोमवार रोजीचा कार्यक्रम उधळून लावण्यात आलाय. दरम्यान या घटनेमुळे तीर्थपुरी परिसरासह तालुका भरामध्ये एकच खळबळ उडाली. घनसावंगी तालक्यातील मौजे तीर्थपुरी तालुका घनसावंगी येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम करणे साठी २०.२७ कोटी रुपयाचे उपजील्हा रूग्णायाचा आज २३ सप्टेंबर सोमवार रोजी भूमीपूजन सोहळा माजीमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते आयोजीत केला होता. यावेळी स्थानीक नगर पंचायती मधील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांना अधिकृत कसलीच माहिती देण्यात आली नाही फक्त उपनगराध्यक्ष यांना काल आमदार राजेश टोपे यांच्या पीए नी फोन करून उद्या कार्यक्रम आहे असे सांगितले. यामुळे तीर्थपुरी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष, उपनराध्यक्ष व काही नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी पसरल्याचे दिसून आलेय. यासाठी त्या ठिकाणी मंडप, खुर्च्या, फलक ही ला...

कार व कंटेनरचा भीषण अपघातात चार ठार!

Image
कार व कंटेनरचा भीषण अपघातात चार ठार! अंबाजोगाई-लातूर मार्गावर झाला भीषण अपघात स्विफ्टकार व कंटेनरचा भीषण अपघातात होउन चारजण जागीच ठार झाल्याची घटना अंबाजोगाई-लातूर मार्गावर पहाटे घडलीय.हा भीषण अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झालाय. स्विफ्टकार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झालाय यामुळे कारमधील चौघेजन ठार झालेत  बीडच्या अंबाजोगाई - लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात  चार जणांचा मृत्यू झाला. पहाटे कार आणि कंटेनरमध्ये टक्कर होऊन हा अपघात घडल्याची माहिती मिळाली यात स्विफ्ट कार मधील मृत्यूमुखी पडलेल्या चौघे लातूरच्या चाकूर तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती आहे. रात्री मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक झाली. मृतांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून छत्रपती संभाजी नगरहून निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरद...

वीज कोसळून १६ जनावरांचा मृत्यू..! तीन शेतकऱ्यांसह एक महिला जखमी

Image
वीज कोसळून १६ जनावरांचा मृत्यू..! तीन शेतकऱ्यांसह एक महिला जखमी काल रवीवारी वीजेच्या प्रचंड कडकडाटासह पाऊस झालाय यात वीज कोसळून पैठण तालुक्यात पंधरा जनावरांचा तर अंबड तालुक्यात एका जनावराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर या विजेमुळे तीन शेतकऱ्यांसह एक महिला किरकोळ जखमी झालेत. पैठण तालुक्यात विहामांडवा सालवडगाव शिवारात वीज कोसळून १५ जनावरांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दि.२२ रोजी दुपारच्या सुमारास घडलीय वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना शासनाच्या वतीने योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली. रविवारी दुपारी पैठण तालुक्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान विहामांडवा परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊन जानकाबाई शकील चव्हाण (रा. सालवडगाव) यांच्या शेती वस्तीवरील गट नंबर ५४५ येथे वीज पडून गाभण असलेल्या ६ मेंढ्या एका कोकरुचा मृत्यू झाला. यासह सालवडगाव येथे मोमीन चव्हाण यांच्या वस्तीवरील ७ मेंढ्या व नानेगाव येथील शेतकरी विष्णू माने यांच्या एका म्हशीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर तात्काळ उपविभागीय ...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या