घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

अतिवृष्टीमुळे खरीपाचे प्रचंड नुकसान होउनही शासन-प्रशासन व विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत एक छद्दामही नाही..!

अतिवृष्टीमुळे खरीपाचे प्रचंड नुकसान होउनही शासन-प्रशासन व विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत एक छद्दामही नाही..!

सोयाबीन काढनी आधीही पाण्यात व नंतरही पाण्यातच..अनंत नैसर्गिक संकटानी शेतकरी हतबल 


वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण 

   जालना जिल्ह्यात मागील महिन्यापासून चोहिकडे धुंवाधार पाऊस पडत आहे मध्यंतरी जिल्हाभरातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली यामुळे खरीप पिके पाण्याखाली जाऊन दहा ते बारा दिवस पिके पाण्याखालीच होती यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले मध्यंतरी पावसाने थोडीशी उघड दिली यामुळे शेतकरी आता सोयाबीनची काढणी करू लागलाय परंतु गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे हे काढणी केलेले सोयाबीनही पाण्यातच डूबत असल्याचे दिसून येत आहे यामुळे शेतकऱ्याचे दोन्ही बाजूने नुकसान होऊ लागलेय. विशेष म्हणजे खरीप पिकाचे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे एवढे नुकसान होऊनही अद्याप पर्यंत शासन-प्रशासन व पिक विमा कंपनी कडून नुकसाभरपाईची मिळालेली नाहीये तसेच त्याबाबत काही माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली नाही.

  शेतकरी राजाला गेल्या तीन-चार वर्षांपासून आनंत नैसर्गिक संकटाचा सामना करवा लागत असून यात दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी, रोगराई, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. एवढं सगळं करूनही शेतकरी कावड कष्ट करून पिकांना जपतो परंतु अचानकच नैसर्गिक संकट उभा राहते यामुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्या जाते यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत दिवसेंदिवस सापडत आहे

   गेल्या महिना भरापासून चोहिकडे धुंवाधार पाऊस पडत आहे.मध्यतरी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली यामुळे खरिपाची पीके पाण्याखाली गेली होती नंतर पावसाने उघड दिल्यामुळे शेकऱ्यांनी शेतात सोयाबीनची काढणी सुरू केली व कापसाचे बोंड कुठेतरी फुटत आहे. परंतु या पावसाने सोयाबीन आणि कापसाचे अतोनात नुकसान होत आहे. सध्या बळीराजा रात्रीपासून घामाने पिकवलेल्या सोयाबीन पिकाच्या काढणी केलेली आहे काही शेतकऱ्यांचे काढणी करून शेतातच सोयाबीन ठेवलेले आहे परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वी पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे काढनि केलेले सोयाबीन पाण्यातच दुखत असल्याचे दिसतेय. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून सोयाबीन ला गोळा करण्यासाठी शेत मजुरासह ताडपत्री मध्ये झाकून ठेवण्यासाठी संघर्ष  करीत आहे. हातातून राशी आलेला घास नेहमीच निसर्ग हिसकावून घेतो. अचानक आकाशात भयानक आशा वीजा कडकत जोरदार व मुसळधार पाऊस सुरू आहे आणि खाली शेतकरी राजा आपल्या शेतातील काढणी करतो आहे व काढणी झालेल्या सोयाबीन एकत्र करून त्यावर ताडपत्रीं ने झाकून ठेवण्याचा केविलवाणी प्रयत्न करत आहे.सध्या हवामान खात्यांनी अंदाज सांगितला आहे की पाऊस असाच आठवडा भर राहू शकतो. अत्यंत मेहनतीने कष्टाने आणि खर्च करून अगदी आता सोयाबीनची रास घरात येण्याची वेळ आलेली असताना वरून राजा बळीराजाला नेहमीच त्रास दायक ठरत आहे कधी ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी अशा अनंत नैसर्गिक संकटाचा सामना करत शेतकरी राजा आपला राहाट गाडा हाकत आहे. तर दुसरीकडे खरीप पिकाचे अतिवृष्टी अवकाळी मुळे प्रचंड नुकसान झालेले असणार शासन प्रशासन व विमा कंपनीकडून अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या शेती पिकाची नुकसान भरपाईचा एक छद्दामही मिळालेल्या नाही हे विशेष 




Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या