घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

कार व कंटेनरचा भीषण अपघातात चार ठार!

कार व कंटेनरचा भीषण अपघातात चार ठार!

अंबाजोगाई-लातूर मार्गावर झाला भीषण अपघात

स्विफ्टकार व कंटेनरचा भीषण अपघातात होउन चारजण जागीच ठार झाल्याची घटना अंबाजोगाई-लातूर मार्गावर पहाटे घडलीय.हा भीषण अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झालाय.

स्विफ्टकार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झालाय यामुळे कारमधील चौघेजन ठार झालेत 
बीडच्या अंबाजोगाई - लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात  चार जणांचा मृत्यू झाला. पहाटे कार आणि कंटेनरमध्ये टक्कर होऊन हा अपघात घडल्याची माहिती मिळाली यात स्विफ्ट कार मधील मृत्यूमुखी पडलेल्या चौघे लातूरच्या चाकूर तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती आहे. रात्री मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक झाली. मृतांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून छत्रपती संभाजी नगरहून निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक झाली. हा अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झाला. यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या