घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

देवेंद्रजी उपोषणाचा प्रत्येकाला अधीकार आहे तर मराठा बांधवांना परवानगी का नाही..!

देवेंद्रजी उपोषणाचा प्रत्येकाला अधीकार आहे तर मराठा बांधवांना परवानगी का नाही..!



वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण 


महाराष्ट्रात जालना जिल्हा विविध आंदोलने, उपोषणे याने ढवळून निघालाय याबरोबरच महाराष्ट्र विविध आंदोलनाने, उपोषणे, रस्ता रोको याने पिंजून निघालाय एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपोषणाचा, आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार आहे असे म्हणतात तर दुसरीकडे त्यांचेच पोलीस प्रशासन मात्र मराठा बांधवांच्या उपोषणाला परवानगी नाकारते यामुळे देवेंद्रजी उपोषणाचा प्रत्येकाला अधिकार आहे तर मराठा बांधवांना परवानगी का नाही असा प्रश्न उपस्थित होतोय..

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मन जरांगे यांनी आंतरवाली सराटीत विविध आंदोलने उपोषणे गेल्या वर्षभरापासून चालू केले आहेत तेथेच काही दिवसापासून अंतरवाली सराटी रोड जवळ वडीगोद्री जवळ ओबीसी बांधवांचेही उपोषण सुरू आहेत त्याला पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळालेली आहे या विविध आंदोलने उपोषणे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना काही पत्रकाराने प्रश्न केला असता प्रत्येकाला उपोषण आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं उपमुख्यमंत्री यांनी सांगितले तर दुसरीकडे मराठा बांधवांनी मनोज पाटील जरांगे यांनी हैद्राबाद, सातारा य बॉम्बे गॅझेट लागु करणे, सगेसोयरे आदेशाची अंमलबजावणी करणे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे यासंदर्भात अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या अमरण उपोषणास पाठींबा म्हणुन संभाजीनगर सोलापूर हायवे वडीगोद्री पुलाखाली वडीगोद्री फाटा पुलाजवळ वार मंगळवार दि. २४ सप्टेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन तहसीलदार अंबड याना दिले होते त्यांची प्रशासकीय मान्यता घेऊन गोंदी पोलिस स्टेशनला उपोषणाची परवानगी घेण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासनाकडून मराठा बांधवांच्या उपोषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आलीय अशी माहिती उपोषण कर्ते मराठा बांधव यांच्या कडून मिळालीय.
  म्हणुन एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपोषणे आंदोलने करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे असे म्हणतात तर दुसरीकडे पोलीस प्रशासनच मराठा बांधवांच्या उपोषणाला परवानगी देत नाही म्हणून याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या