अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

अंबड -घनसावंगी तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून तर दुसऱ्याचा शॉक लागून मृत्यू..!

अंबड -घनसावंगी तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून तर दुसऱ्याचा शॉक लागून मृत्यू..!

घनसावंगी तालुक्यात वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर अंबड तालुक्यात वीजेचा शाॅक लागुन शाळकरी मुलाचा मृत्यू..!



वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण 

जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला असून घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली दाई येथील शेतकरी अशोक भागुजी गंदाखे हे शेतातून काम करून घरी परत जात असताना अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडलीय. तर दुसरी घटना अंबङ तालूक्यातील हारतखेङा येथील प्रणव भिकाजी ढवळे (वय ११ वर्षे ) याचा हारतखेडा शिवारातील शेतात गेला असता तेथुन एका तारेला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडलीय.

अंतरवाली दाई ता. घनसावंगी येथील शेतकरी अशोक भागुजी गंदाखे (वय ४० वर्षे) हे सकाळीच आपल्या शेतात गेले होते शेतातून काम करून दुपारच्या सुमरास घरी वापस येत असताना भरत सिताराम गोटे यांच्या गट नंबर ४१ व ४२ च्या मध्ये त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
   त्यांच्या कुटुंबात आई- वडील, मुलगा, पत्नी व मुलगी असा मोठा परिवार आहे या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाची शोककळा पसरली असून या परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर प्राथमिक आरोग्य केंद्र राणी उंचेगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर रात्री अंतरवाली दाई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुसऱ्या घटनेत अंबड तालुक्यात वीजेचा शाॅक लागून 
हारतखेङा येथील प्रणव भिकाजी ढवळे (वय ११ वर्षे ) या शाळकरी मुलांचा मृत्यू झालाय हारतखेडा येथील डि .पी.जळालेली होती ती जालाना येथे भरण्यासाठी नेलेली असतांना याच तारेवर गावातील ङिपी मधून दुसर्यांनी लाईट नेलेली होती ते लक्षात आले नाही .प्रणव हा रविवारी आई वङीलासोबत शाळेला सुटी असल्यामुळे शेतात गेला होता बाजूच्या शेतात आई वङिल कपाशीचे पोलन करत होते. त्याच बाजूला शेतातून विधूत तारे गेलेली आहे त्यात एक तार तुटून खाली पङलेला होता त्याच्या लक्षात न आल्याने त्याचा स्पर्श होऊन तार अंगाला चिटकल्या गेल्याणे त्याचा मृत्यू झालाय. त्याच्या पच्छात आई, वङील,दोन बहीणी ,चुलते असा परिवार आहे. दरम्यान वीज वितरण कंपनीच्या भोगळ कारभारामुळे या बालकांचा मृत्यू झाला आल्याची महिती नातेवकानी दिलीय.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या