Posts

Showing posts from October, 2025

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना महापालिका आयुक्त १० लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Image
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई – दहा लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       जालना महानगरपालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने दहा लाख रुपयांची लाच प्रकरणा बाबत पकडले आहे. या धडक कारवाईमुळे शहरासह जिल्ह्यातील प्रशासनिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.     सूत्रांकडून प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, एका स्थानिक कंत्राटदाराने महानगरपालिकेकडील इमारतीच्या बांधकामाशी संबंधित थकीत देयकांच्या मंजुरीसाठी आयुक्त खांडेकर यांनी दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB पथकाने सापळा रचला आणि गुरुवारी प्रत्यक्ष कारवाईदरम्यान आयुक्त खांडेकर यांनी मागितलेली काही रक्कम स्वीकारल्याचे आढळले.    यानंतर ACB पथकाने तत्काळ खांडेकर यांना त्यांच्या निवासस्थानीच जेरबंद केले. घटनेनंतर जालना ACB कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, मोबाईल कॉल रेकॉर्डिंग आणि आर्थिक व्यवहाराच...

सरकारकडून ₹४८० कोटींपेक्षा अधिक अनुदान वितरित ! जालना जिल्ह्याचा समावेश

Image
अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक सीएलएस-२०२५/प्र.क्र.२३५ (भाग-११)/म-३, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ अन्वये राज्य सरकारने ₹४८० कोटी ५० लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.      महसूल व वन विभागाचे सह सचिव संपत सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण पाच जिल्ह्यांतील (अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना आणि हिंगोली) शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. शासन निर्णयानुसार, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून ठरविलेल्या निकषांप्रमाणे निविष्ठा अनुदान (Input Subsidy) म्हणून ही मदत दिली जाणार आहे. बाधित जिल्हे व निधीचे विवरण  विभाग जिल्हा कालावधी बाधित शेतकरी बाधित क्...

अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांना कोणाला व कशी मिळणार मदत- शासन निर्णय जारी

Image
राज्य सरकारचा मोठा निर्णय — २५३ तालुके घोषित, ₹३१,६२८ कोटींचं विशेष मदत पॅकेज जाहीर वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी, घरमालक आणि सर्वसामान्य जनतेचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने आज दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी शासन निर्णय क्रमांक सीएलएस-२०२५/ प्र.क्र.३६५/म-३ (मदत-१) जारी करून २५३ तालुके “अतिवृष्टी व पुरग्रस्त” म्हणून घोषित केले असून ₹३१,६२८ कोटी रुपयांचे विशेष मदत पॅकेज (Relief Package) जाहीर केले आहे. प्रमुख निर्णय आणि मदत दर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार बाधितांना खालीलप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येईल: क्र. बाब मदत रक्कम १ आपत्तीग्रस्त मृत व्यक्तीच्या वारसांना ₹४.०० लाख २ अपंगत्व (४०%-६०%) ₹७४,००० ३ अपंगत्व (६०% पेक्षा अधिक) ₹२.५० लाख ४ जखमी व्यक्ती (१ आठवड्यापेक्षा अधिक) ₹१६,००० ५ जखमी व्यक्ती (१ आठवड्यापेक्षा कमी) ₹५,४०० ६ पूर्णतः नष्ट झालेलं घर (सपाट भाग) ₹१,२०,००० ७ पूर्णतः नष्ट झालेलं घर (डोंगराळ भाग) ₹१,३०,००० ८ अंशतः पडझड...

जालना जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांसाठी सभापती पदांसाठी आरक्षण सोडत दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.     जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी कळविल्यानुसार, शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण (महिला) या गटांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नामांकित महिलांसह) राखीव ठेवावयाच्या सभापती पदांची संख्या निश्चित केली असून ती पुढीलप्रमाणे आहे: अनुसूचित जाती : १ अनुसूचित जाती (महिला) : १ अनुसूचित जमाती : १ अनुसूचित जमाती (महिला) : १ नागरिकांचा मागास प्रवर्ग : २ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : १ सर्वसाधारण : १ सर्वसाधारण (महिला) : १     एकूण आठ पंचायत समित्यांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात येत असून, त्या दिवशी सर्वसामान्य नागरिक व इच्छुकांनी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे हजर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.    ही सोडत जिल्हाधिकार...

एसटी आरक्षणासाठी धनगर बांधवांचे जिल्हाभरात चक्का जाम

Image
आरक्षण व दिपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी तात्काळ मान्य करावी, या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्हाभरात धनगर बांधवांनी सोमवारी (१ ऑक्टोबर) मोठ्या संख्येने रस्ता रोको आंदोलन करून चक्काजाम केला. जालना येथे उपोषण करणारे प्रमुख आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात धनगर बांधवांची उपस्थिती होती. यावेळी वाहतूक ठप्प झाली होती.   अंबड, घनसावंगी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, राजनी, विरेगाव यांसह तालुक्यातील विविध ठिकाणी आज सकाळीच धनगर समाजाच्या बांधवांनी संतप्त घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरून वाहतूक ठप्प केली. तीर्थपुरी येथील अंबड–तीर्थपुरी मार्गावरील डाव्या कालव्याच्या पुलावर आंदोलन केले. यावेळी तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सपोनी वैशाली पवार यांना निवेदन सादर केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.     धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेशाची अंमलबजावणी करण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सरकार फक्त आश्वासने देत आहे, प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे, असा...

जालना - पोलीस पाटील भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ !

Image
अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांची माहिती  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी जालना, अंबड, भोकरदन व परतूर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पोलीस पाटील भरती-२०२५ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.      मुळात अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील सध्या सुरू असलेल्या पूरपरिस्थिती व पर्जन्यमानाचा विचार करून प्रशासनाने अर्ज करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलत २ ऑक्टोबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.      अर्जदारांनी आपले अर्ज ऑनलाईन माध्यमातून सादर करणे आवश्यक आहे. अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सर्व परीक्षार्थ्यांना अर्ज करण्याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.     अर्जदारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे, अन्यथा अर्ज मान्य होणार नाही.

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या